वॉशिंग्टन - हरवलेल्या मुलांचा शोध घेणे अनेक वेळा अतिशय कठीण काम होते. चेहरा ओळखणा-या उपकरणाद्वारे त्यांचा शोध घेणे सहज लवकरच शक्य होणार आहे. कारण अशा प्रकारच्या उपकरणाची निर्मिती करण्यात संशोधकांना यश आले आहे. सेंट्रल फ्लोरिडा युनिव्हर्सिटीच्या संशोधक टीमच्या प्रकल्पात हे टूल तयार करण्यात आले आहे.
त्यासाठी संशोधकांनी ऑनलाइन 10 हजारांहून अधिक प्रतिमा गोळा केल्या आहेत. त्यात सेलिब्रिटी, राजकीय पुढारी आणि मुलांचे फोटो आहेत. हरवलेल्या मुलांचा शोध घेण्यात हे टूल खूप उपयोगी ठरते. कारण अनेक वर्षांनंतर मुलांचा प्रौढ चेहरा तयार करण्याची क्षमता यात आहे. त्यातून त्यांचा वर्तमान चेह-याची कल्पना सहजपणे येऊ शकेल.