आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Research : People Like To Watch The Violence And Blood Sheding In Films

संशोधन : लोकांना चित्रपटात हिंसक व रक्तरंजित दृश्‍य पाहायला आवडतात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - वास्तविक जीवनात हिंसक पैलूंना महत्त्व आहे, असे वाटत असल्यामुळेच लोकांना चित्रपटात हिंसक आणि रक्तरंजित दृश्ये पाहायला आवडतात, असे एका संशोधनात स्पष्ट झाले आहे.

चित्रपट प्रेक्षक मारधाड, रक्तपात आणि हिंसाचाराकडे का आकर्षित होतात, याबाबत जर्मनीच्या ऑगसबर्ग विद्यापीठ आणि विस्कॉन्सिन- मॅडिसन विद्यापीठाने संशोधन केले. त्यासाठी त्यांनी जर्मनी आणि अमेरिकेतील 482 लोकांचे सर्वेक्षण केले. हे सर्व लोक 18 ते 82 वयोगटातील होते. जीवनात सत्यासाठीची प्रेरणा म्हणून अशी दृश्ये आवडत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. अशा दृश्यांमध्ये प्रेक्षक स्वत:चे प्रतिबिंब शोधत असतो, असे अ‍ॅनी बर्टेस यांनी म्हटले आहे.