आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संशोधन : शास्त्रज्ञांनी साकारला मेंदूचा ‘थ्रीडी मॅप’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - शास्त्रज्ञांनी पहिल्यांदाच मानवी मेंदूचा थ्रीडी मॅप (त्रिमिती रचना) तयार केली आहे. यामुळे मानवी भावनेशी संबंधित प्रक्रियेचा अभ्यास करण्यास उपयोग होणार आहे.बिग ब्रेन प्रोजेक्टअंतर्गत एका 65 वर्षीय महिलेचा थ्रीडी मॅप तयार करण्यात आला. शास्त्रज्ञांनी त्यासाठी 20 मायक्रोमीटर (केसापेक्षाही पातळ) जाडीच्या 7400 पदरांमध्ये त्याची विभागणी केली. याच्या साहाय्याने शास्त्रज्ञांना मेंदूतील पेशी रचनेपर्यंत पोहोचण्यात यश मिळाले. मायक्रोमीटर एक मीटरचा दहा लाखावा भाग असतो. विज्ञानाने अखेर मेंदूचा उलगडा झाला, असे संशोधनात सहभागी माँट्रियल न्यूरोलॉजिकल इन्स्टिट्यूटमधील प्रो. एलन इवान्स यांनी सांगितले. आतापर्यंत एक गुणिले एक अशा पद्धतीने संशोधन केले जात होते. मात्र, यापुढे मेंदूचा अभ्यास 50 पट अधिक खोलात जाऊन होऊ शकेल.


एक हजार तासांत केले स्कॅनिंग
इवान्स म्हणाले, शास्त्रज्ञांनी मायक्रोटोन या उपकरणाच्या मदतीने मेंदूतील पदर स्लाइड्सना लावले. त्यानंतर उच्च दर्जाच्या स्कॅनरद्वारे स्कॅन करण्यात आले. या प्रक्रियेसाठी एक हजार तास वेळ लागला.
असा होईल फायदा > मेंदूचा बारकाईने अभ्यास केल्यास भावना तयार होणे, ओळखण्याची क्षमता विकसित होण्याची प्रक्रिया व त्याची कारणे मिळू शकतील. > आजारपणाची कारणेही समजू शकतील.