आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Results Of Scotland Independence Referendum News In Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

\'स्कॉटलॅंड\'ला नकोय स्वातंत्र्य, 55 टक्के लोकांनी दिला ग्रेट ब्रिटेनच्या बाजुने कौल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्लासगो- 'स्कॉटलँड' हा स्वतंत्र देश होणार नसल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. स्कॉटलँडला स्वतंत्र देशाचा दर्जा मिळावा, यासाठी घेण्यात आलेल्या जनमत चाचणीत जाहीर झाले आहे. स्कॉटलँड हे ब्रिटनमध्येच राहावे, याबाजुने 55 टक्के लोकांनी मतदात केले आहे.

'स्कॉटलॅंड' हा स्वतंत्र देश व्हावा की ग्रेट ब्रिटनमध्येच राहावा, यासाठी गुरुवारी जनमत चाचणी घेण्यात आली होती. नंतर आज (शुक्रवार) सकाळी मतमोजणी झाली. 55 टक्के लोकांनी स्कॉटलॅंडला स्वतंत्र देशाचा दर्जा मिळण्यास विरोध दर्शवला तर 45 टक्के लोकांना स्कॉटलॅंड हा देश स्वतंत्र हवा असल्याचे मत नोंदवले.

स्वतंत्र स्कॉटलॅंडच्या विरोधात 1,877,252 मते मिळाली. तर स्कॉटलँड स्वतंत्र व्हावा, याबाजूने 1,512,688 मते मिळाली. स्कॉटलँडला स्वतंत्र देशाचा दर्जा मिळण्यासाठी 1,852,828 मते आवश्यक होते. सुमारे 307 वर्षांपासून ग्रेट ब्रिटेनचा अविभाज्य भाग असलेले स्कॉटलँडसाठी 42 लाख लोकांच्या जनमताच्या आधारे निर्णय घेण्यात आला.
ब्रिटनच्या इतिहासात पहिल्यादा स्कॉटलँडला स्वतंत्र देशाचा दर्जा मिळवण्यासाठी व्यापक प्रमाणात जनमत चाचणी घेण्यात आली. मतदारांमध्ये 16 वर्षे वयोगटातील युवकांनाही सहभागी करून घेण्यात आले होते.

ब्रिटिश पंतप्रधान डेव्हिड कॅमरन म्हणाले, 'यूनाइटेड किंगडम' अखंड राहणार असल्याचे जनतेने दाखवून दिले आहे. ही खूप आनंदाची गोष्ट आहे. देशाची राष्ट्रीय एकता पुन्हा एकदा या जनमत चाचणीतून जगासमोर आली आहे.
स्कॉटलॅंडला स्वतंत्र देशाचा दर्जा मिळावा, यासाठी 'YES' कॅम्पेन चालवणार्‍या स्कॉटिश नॅशनल पक्षाचे नेते एलेक्स सॅलमंड यांनी जनतेचा कौल स्विकारला आहे. सॅलमंड म्हणाले, 16 लाख स्कॉटिश लोकांना स्वातंत्र हवे असल्याचे मान्य केले आहे. स्कॉटलॅंड स्वतंत्र होण्याची ही संधी होती. परंतु तसे होऊ शकले नाही. जनतेला निर्णय मान्य आहे.

क्लाकमॅनशर येथून आला पहिला निकाल...
जनमत चाचणीचा पहिला निकाल क्लाकमॅनशर येथून आला. 19,036 मतदारांनी स्कॉटलँड स्वतंत्र देश बनण्यास विरोध दर्शवला आहे. तर 16,350 लोकांनी स्कॉटलँड हा स्वतंत्र देश व्हावा, या बाजुने मत‍दान केले आहे. क्लॉकमॅनशरमध्ये 89 टक्के मतदान झाले.

ऑर्कनी येथून दुसरा निकाल आला. स्वतंत्र स्कॉटलॅंडच्या बाजून 4,883 मते तर विरोधात 10,004 मते मिळाली. ऑर्कनीमध्ये 83.7 टक्के मतदान झाले.

इनवर्सलीडयमध्ये 87.4 टक्के मतदान
स्वतंत्र स्कॉटलँडच्या बाजूने: 27,243 मते (49.9 टक्के)
स्वतंत्र स्कॉटलँडच्या विरोधात: 27,329 मते (50.1 टक्के)

वेस्टर्न आयसलेसमध्ये 86.2 टक्के मतदान
स्वतंत्र स्कॉटलँडच्या बाजूने: 9,195 मते (46.6 टक्के)
स्वतंत्र स्कॉटलँडच्या विरोधात: 10,544 मते (53.4 टक्के)

शेटलॅंडमध्ये 84.4 टक्के मतदान
स्वतंत्र स्कॉटलँडच्या बाजूने: 5,669 मते (36.3 टक्के)
स्वतंत्र स्कॉटलँडच्या विरोधात: 9,951 मते (63.7 टक्के)
दरम्यान, स्वतंत्र स्कॉटलंडसाठी गुरुवारी जनमत चाचणी घेण्यात आली होती. 307 वर्षांपासून ग्रेट ब्रिटेनमध्ये असलेल्या स्कॉटलँडला स्वंतत्र देश करावा की, ब्रिटनमध्येच ठेवावे यासाठी सुमारे 42 लाख जनमतांचा आधार घेण्यात आला. गुरुवारी मतदान केंद्राबाहेर नागरिकांनी मोठ्या रांगा लावल्या होत्या. आपापल्या पर्यायाबाबत लोक भावूक होऊन मत व्यक्त करत होते. या निर्णयाचा दूरगामी परिणाम माझ्या मुलांच्या भवितव्यावर होणार असल्याचे 34 वर्षीय चार्लोट फारिश या महिलेने सांगितले.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, अँडी मरेचा पाठिंबा.....
(फोटो: ग्लासगो मध्ये 'नो' कॅम्पेनला पाठिंबा देणारी महिला)