आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Revealed Airasia Jet Qz8501 Climbed At Abnormal Speed Before It Crashed

प्रचंड वेगात अधिक उंचावर जात असताना समुद्रात कोसळले Air Asia चे विमान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(एअर एशियाचे विमानाच्या अवशेषाजवळ उभे असलेले तपास अधिकारी)

जकार्ता- एअर एशियाचे विमान 'QZ8501'च्या दुर्घटनेबाबत इंडोनेशियाचे परिवहन मंत्री इग्नेसियस जोनान यांनी नवा खुलासा केला आहे. जावा समुद्रात कोळलेले विमान निर्धारित वेगापेक्षा प्रचंड वेगात अधिक उंचावर जात असताना समुद्रात कोसळल्याचे जोनान यांनी संगितले. इग्नेसियस जोनान हे संसदीय आयोगाच्या बैठकीत बोलत होते.

'रडार डाटा'वरून मिळालेल्या मा‍हितीनुसार, दुर्घटनाग्रस्त विमान कोसळण्याच्या ठीक एक मिनिट आधी 6000 फूट (1,800 मीटर) प्रति मिनिट वेगाने उंचावर जात होते. याआधी विमान 32,000 फूट (9,753 मीटर) उंचावर झेपावत होते. खराब हवामानामुळे विमान 38,000 फूट उंचावर नेण्याची वैमानिकाने परवानगी मा‍गितली होती. याप्रकरणी प्राथमिक अहवाल 28 जानेवारीला जाहीर करण्यात येणार आहे.

दरम्यान, 28 डिसेंबर 2014 रोजी 162 प्रवाशांना घेऊन विमान सुराबायाहून सिंगापूरला निघाले होते. दुर्घटनेत सर्व प्रवाशांचा मृत्यु झाला आहे.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा, विमानाच्या अवशेषांचे फोटो...