आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Revolt In Philipiness For The Separate Islamic Nation

स्वतंत्र इस्लामी राष्ट्रासाठी फिलीपीन्समध्ये बंड; शेकडो नागरिक ओलीस, 9 ठार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फिलीपीन्सच्या दक्षिण भागातील झाम्बोगा शहरात भीषण दंगल उसळली आहे. झाम्बोगा भागास स्वतंत्र इस्लामी राष्ट्र म्हणून घोषित करण्यात यावे या मागणीसाठी मोरो नॅशनल लिबरेशन फ्रंट (एमएनएलएफ) या संघटनेने सरकारविरोधात नारा दिला आहे. दंगल शमवण्यासाठी खास अमेरिकी प्रशिक्षित फिलीपीनो लष्कराच्या जवानांना तैनात करण्यात आले आहे.सोमवारपासून सुरु झालेल्या दंगलीत आतापर्यंत 9 बळी गेले असून बंडखोरांनी 100 नागरिकांना ‘मानवी ढाल’ म्हणून ओलिस ठेवले आहे.