आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ri Sol Ju, Wife Of Kim Jong Un, Rumoured Pregnant

उत्तर कोरियाच्या हुकुमशहाची पत्नी दुसर्‍यांदा गरोदर? अफवांना ऊत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सियोल- उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जोंग ऊन यांची पत्नी री सोल ज्यू या दुसर्‍यांदा गरोदर असल्याचे वृत्त आहे. री सोल ज्यू यांनी एका कार्यक्रमात ‍सैल ड्रेसमध्ये उपस्थिती दिल्यानंतर त्या गरोदर असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. विशेष म्हणजे री सोल जू यांचे छायाचित्र प्रसिद्ध होताच आंतरराष्ट्रीय मीडियात अफवांनाही ऊत आला आहे.

नॉर्थ कोरियन वृत्तपत्र 'रोडोंग सिनमुन'मध्ये री सोल ज्यू यांचे एक छायाचित्र प्रसिद्ध झाले आहे. त्यात त्यांनी अत्यंत सैल ड्रेस परिधान केला आहे. सोल यांचे वजन वाढल्याचा अंदाजही या वृत्तपत्राने वर्तवला आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय मीडियात सोल या गरोदर असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. 2012 मध्ये मुलीला जन्म देण्यापूर्वी सोल अशाच प्रकारच्या सैल ड्रेसमध्ये दिसल्या होत्या.

साऊथ कोरियन वृत्तपत्र 'दी चोसुन इल्बो'ने सोलच्या छायाचित्रासोबत पहिल्या गरोदर काळातील छायाचित्र प्रसिद्ध केले आहे.

किम जोंग यांचे विवाहबाह्य संबंध असल्याचेही समजते. या संबंधातून किम यांना एक मुलगी आहे. किम यांना उत्तर कोरियाच्या हुकुमशाहीला वारस हवा आहे. त्यामुळे किम यांना पुत्राची प्रतिक्षा आहे.