आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • City SP Dev Narayan Patel Suicide Case, Final Rites Done In Hi Village

सीएसपीने पत्नीची हत्या करून केली आत्महत्या; एकाच चितेवर अत्यंसंस्कार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रायपूर- पत्नीची गोळ्या घालून हत्या केल्यानंतर स्वत: आत्महत्या करणारे जगदलपूरचे शहर पोलिस अधिक्षक (सीएसपी) देव नारायण पटेल यांच्या पार्थिवावर बिलासपूर येथील मानिकचौरी येथे अंत्यसंस्कार करण्‍यात आले. पटेल यांच्यासह त्यांच्या पत्नीची अंत्ययात्रा काढण्यात आली होती. अत्यंयात्रेत मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले होते. एकाच चितेवर पटेल दाम्पत्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्‍यात आले. गार्ड ऑफ ऑनर दिल्यानंतर त्यांचा पुतण्या राकेश पटेल याने मुखाग्नी दिला. यावेळी मस्तुरीचे आमदार लक्ष्मण मस्तुरिया आणि पोलिस अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पटेल दाम्पत्याच्या पार्थिवावर त्यांच्या घरासमोरच असलेल्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले. विशेष म्हणजे पटेल दाम्पत्याचे अंत्यसंस्कार एकाच ‍चितेवर करण्यात आले.

दरम्यान,सीएसपी पटेल यांनी गेल्या सोमवारी पत्नीची हत्या करून स्वत: आत्महत्या केली होती. न्यायाधिशांना मारहाण केल्याचा पटेल यांचावर आरोप आहे. या अारोपावरून सीएसपी पटेल यांना निलंबित करण्‍यात आले होते. पटेल यांनी याच कारणामुळे आत्महत्या केल्याचेही बोलले जात आहे. आत्महत्या करण्यापूर्वी पटेल यांनी घराच्या छतावर फायरिंग केली होती. त्यामुळे त्यांचे दोन्ही मुले गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

जगदलपूरमध्ये अतिरिक्त न्यायाधिश ए.टोप्पो मद्य पिऊन गाडी चालवत होते. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. पटेल यांनी न्यायाधिश टोप्पो यांना रोकण्याचा प्रयत्न केला. परंतु ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. दोघांमध्ये बाचाबाचीही झाली होती. मात्र, त्यानंतर टोप्पो यांनी पटेल यांच्या विरोधात हाय कोर्टात तक्रार केल्याने त्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले होते.

आत्महत्या करण्‍यापूर्वी सीएसपी देवनारायण पटेल यांनी डीएसपी (नक्सल ऑपरेशन) सुखनंदन राठोड यांच्याशी न्यायाधिशांना मारहाण केल्याप्रकरणी चर्चा केली होती. आपल्याला अडकवण्यात आले असून आपण निर्दोष असल्याचे पटेल यांनी सांगितले होते. पटेल यांच्या आत्महत्येप्रकरणी न्यायालयीन चौकशीचेही आदेश देण्यात आले आहे.

देवनारायण पटेल यांनी नक्सल भागात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांना शौर्य पुरस्कार देऊनही गौरविण्यात आले होते.

पुढील स्लाइडवर पाहा, देव नारायण पटेल यांच्या अंत्यविधीची छायाचित्रे...