आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेक्सिकोत गरीब-श्रीमंतांचा भेद दर्शवणारी छायाचित्रांची मालिका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेक्सिकोमध्ये गरीब आणि श्रीमंतांतील फरक दर्शवणाऱ्या या छायाचित्रास इंटरनेटवर अमाप प्रसिद्धी मिळाली. दोन वर्गांत वाढत असलेले अंतर एका छायाचित्र मालिकेतून दाखवण्यात आले आहे. त्या मालिकेतील हे छायाचित्र आहे. येथील बेनामॅक्स बँकेच्या वतीने "इरेज द डिफरन्स' अशी जहिरात मोहीम सुरू केली आहे. यासाठी छायाचित्रकार ऑस्कर रुईज यांचे सहकार्य घेतले. रुईज छायाचित्रकार तर आहेतच; शिवाय हेलिकॉप्टर पायलट आहेत. त्यांनी जेव्हा मेक्सिको शहरावर आकाशातून चक्कर मारली तेव्हा हा फरक त्यांच्या लक्षात आला. या वेळी त्यांनी हे छायाचित्र टिपले. एका बाजूला शहरातील अपार्टमेंट्स, विला आणि लक्झरियस घरे दिसली, तर दुसरीकडे रंग उडालेल्या इमारती होत्या.

फोटोशॉपचा वापर नव्हे
एकीकडे लक्झरियस घरे आणि दुसरीकडे रंग उडालेल्या जुन्या इमारती पाहून हे छायाचित्र फोटोशॉपद्वारे बनवले असल्याचे वाटते; परंतु प्रतिमा बदललेली नाही. मेक्सिकोमध्ये ४६ टक्के जनता गरीब अवस्थेत जीवन कंठत आहे. आर्थिक विषमतेत या देशाचा पहिला क्रमांक लागतो. येथील दोन कोटी जनता मोडक्यातोडक्या घरांत राहते. आता बँकेच्या मोहिमेचा भाग जगभरात चर्चेचा मुद्दा बनला आहे.
iflscience.com