आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rich Indians Doing Marriage Reception In Mauritius

श्रीमंत भारतीयांचे व-हाड निघालंय मॉरिशसला!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पोर्ट लुइस- मॉरिशस पर्यटन स्थळाबरोबरच श्रीमंत भारतीयांना विवाह आयोजित करण्यासाठी खुणावणारे डेस्टिनेशन ठरू लागले आहे. आप्तेष्ट, मित्र-परिवार एवढेच नाही तर बॉलीवूड स्टारला चार्टर्ड विमानाने आणून विवाह सोहळा येथे अनेक दिवस रंगू लागला आहे.

मॉरिशसमध्ये होणा-या विवाह सोहळ्यात धार्मिक विधीबरोबरच बीच पार्टी, बॉलीवूड स्टार्सचे परफॉर्मन्सेस यांचाही त्यात समावेश असतो. खासगी विमानाने श्रीमंत भारतीय मंडळी येथे येतात आणि विवाहाचा सोहळा जंगी पद्धतीने साजरा करतात. ही परंपरा येथे काही दिवसांपासून सुरू झाल्याचे दिसून येत आहे, असे भारताचे मॉरिशसमधील उच्चायुक्त टी.पी. सीताराम यांनी पत्रकारांना सांगितले. महिन्यातून दोन ते तीन भारतीय विवाह समारंभांचे आम्ही येथे आयोजन करतो, असे इंटरकॉन्टिनेंटल मॉरिशसच्या मॅनेजरचे म्हणणे आहे. रिसोर्टमध्ये इंडियन शेफ, इंडियन फूड, थाई, चिनी, इटालियन खाद्यपदार्थांची रेलचेल पाहायला मिळते. त्यामुळे त्याला भारतीय आयोजकांकडून पसंती मिळते. भारतीय नागरिक हनिमूनसाठी मॉरिशसला आवर्जून भेट देतात. मॉरिशसची नितळ किनारे, स्थानिकांची फ्रेंडली वागणूक, चांगल्या संधी त्याशिवाय उत्साहवर्धक वॉटर स्पोर्ट्स या गोष्टी भारतीयांना आकर्षित करू लागल्या आहेत.

कोट्यधीश व रिसोर्ट- भारतीय कोट्यधीश, त्यातही मोठ्या प्रमाणातील उद्योजकांत अशा प्रकारचा विवाह आयोजित करण्यासाठी ‘ओबेरॉय मॉरिशस’ व ‘इंटरकॉन्टिनेंटल मॉरिशस’ या रिसोर्टला अधिक प्राधान्य आहे. ही रिसोर्ट्स समुद्र किना-यावर आहेत.

68 टक्के भारतीय- मॉरिशसमध्ये राष्ट्राध्यक्ष राजकेश्वर पुर्याग, पंतप्रधान नवीनचंद्रा रामगुलम यांच्यासह देशातील 68% नागरिक भारतीय वंशाचे आहेत.