आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीमंतीचे साइड इफेक्ट; अति पैशामुळे कंजुषीची सवय, 'बर्कले'च्या प्रोफेसरचा दावा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सॅक्रामेंटो- श्रीमंत मनुष्य कंजूष,चंगळवादी, भौतिकवादी होतो. त्यामुळे तो समाजापासून तुटला जातो आणि स्वत:च्या वैभवातच हरवून जातो. श्रीमंत होताच त्याला इतरांच्या समस्या दिसणे बंद होऊन जाते. तो स्वत:मध्ये गुंतून जातो. तो एकलकोंडा होतो, असा दावा बर्कले विद्यापीठातील प्रोफेसरांनी केला आहे.
श्रीमंत मनुष्य मनाने संकुचित, कंजूष असतो. लोकांना वेळेवर मदत करणे त्याला महत्त्वाचे वाटत नाही. तो कुटुंबाला थोडेफार महत्त्व देतो. परंतु त्याच्या डोक्यातून समाज जणू गायब होऊन जातो. अर्थात त्याला काहीही महत्त्व नसते. दोन प्रोफेसरांनी यासंदर्भात गुगलवर अनेक लाख पुस्तकांचे अवलोकन केले. त्यात श्रीमंत झालेल्या लोकांची भाषादेखील बदलू लागते. त्यांच्या तोंडी नेहमी असलेल्या शब्दांची जागा नवीन शब्दांनी घेतलेली असते.

एका गावाचा 40 वर्षे अभ्यास
ग्रेटर गुड सायन्स सेंटरचे संचालक व बर्कले विद्यापीठातील मानसशास्त्र विभागाचे प्रोफेसर दाशे केल्नर व विकासात्मक मानसशास्त्राचे प्रोफेसर पॅट्रिशिया ग्रीनफील्ड यांनी मेक्सिकोतील शियापास या गावाचा 40 वर्षे अभ्यास केला. मेक्सिकोच्या शियापास गावात लोक जेव्हा गरीब होते तेव्हा ते सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन करत होते. आता या गावातील लोक श्रीमंत झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या व्यक्तिस्वातंत्र्याचे महत्त्व वाढले आहे. त्यांचे सामाजिक बंध हळूहळू कमकुवत होऊ लागले आहेत.

श्रीमंतीचे साइड इफेक्ट
>श्रीमंत झाल्यानंतर इतरांच्या अडचणी, समस्या दिसत नाहीत.
>कुटुंबाचे थोडे महत्त्व असते, परंतु समाजाचे नाही.
>श्रीमंत झाल्यानंतर लोकांच्या भाषेतही बदल.

जसा विचार तसा शब्दप्रयोग
शब्दांवर करण्यात आलेल्या अभ्यासात श्रीमंत लोक ज्याप्रमाणे विचार करतात त्याचप्रमाणे शब्दांचा वापर करतात, असे दिसून आले. 1880 पासून ‘देणे’सारख्या शब्दांच्या वापरात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. गिव्ह, ऑब्लाइड, बिलाँगसारखे शब्द बोलण्यातून कमी प्रमाणात येतात.