आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Virgin Galactic Company Spaceship Crashed During Test Flight

VIDEO: अंतराळ भ्रमणावर निघालेली स्पेसशिप कोसळली, वैमानिकाचा दुर्दैवी मृत्यू

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कॅलिफोर्निया- अब्जाधिश रिचर्ड ब्रॅन्सन यांच्या व्यावयायिक स्पेस टुरिझमला जोरदार धक्का बसला आहे. सामान्य जनतेला अंतराळ भ्रमण घडवून आणण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या कंपनीची व्हर्जिन गॅलेक्टिक स्पेसशिप जमिनीवर कोसळली आहे. यात एका वैमानिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून एक गंभीर जखमी झाला आहे.
कशी झाली दुर्घटना
व्हर्जिन गॅलेक्टिक स्पेसशिप २ ची चाचणी घेत असताना यात साधारणपणे दोन वैमानिक असतात. यासाठी मोजेव वाळवंटाजवळ असलेल्या हवाई दलाच्या वेसवरुन उड्डाण करण्यात आले होते. लॉंच विमानापासून विलग झाल्यानंतर लगेच स्पेसशिपचे तुकडे झाले. यापूर्वी लॉंच विमानाच्या माध्यमातून तिला तब्बल 45 हजार फूट उंचीवर नेण्यात आले होते. या स्पेसशिपचे तुकडे दूरवर विखुरले गेले आहेत. बचाव पथकाचे सदस्य स्पेसशिप कोसळली त्या ठिकाणी गेले तेव्हा एका वैमानिकाचा मृत्यू झाल्याचे आढळून आले. दुसऱ्या वैमानिकाने इमरजन्सी पॅराशुटचा वापर केला होता. तरीही तो गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या वैमानिकांची ओळख जाहीर करण्यात आलेली नाही.
काय म्हणाली कंपनी
स्पेसशिप २ वर एका वेगळ्या प्रकारच्या इंधानाची चाचणी घेण्यात येत होती. याचा वापर यापूर्वी करण्यात आलेला नव्हता. याची याआधी प्रयोगशाळेत चाचणी घेण्यात आली होती. परंतु, यामुळेच अपघात झाला असे आताच सांगता येणार नाही.
पुढील स्लाईडवर बघा, या दुर्घटनेचे हृदयाचा थरकाप उडवणारी छायाचित्रे....बघा घटनास्थळाचा व्हिडिओ...