आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Obama Nominates Richard Rahul Verma As US Ambassador To India

भारतातील अमेरिकेचे नवे राजदूत म्हणून रिचर्ड राहूल वर्मा यांची नियुक्ती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - अमेरिकन सिनेटकडून भारतीय वंशाचे रिचर्ड राहुल वर्मा यांची भारतातील अमेरिकेचे नवे राजदूत म्हणून घोषणा झाली आहे. सिनेटमध्ये झालेल्या आवाजी मतदानानंतर रिचर्ड वर्मा यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
वर्मा हे 46 वर्षांचे असून, भारतातील अमेरिकेचे राजदूत होणारे ते भारतीय वंशाचे पहिले नागरिक असणार आहेत. येत्या 26 जानेवारीला बराक ओबामा भारत दौऱ्यावर येणार आहेत. त्याआधी परिस्थिताचा आढावा घेण्यासाठी येणार आहेत. भारतात राजदूत होण्यासाठी पन्नासहून अधिक अर्ज आले होते.
वर्मा यांनी भारत आणि अमेरिका यांच्यातील आण्विक करारावेळी महत्त्वाची भूमिका बजाविली होती.ओबामा यांच्या प्रशासनामध्ये 2009 ते 2011 या काळात परराष्ट्र मंत्रालयात ते सहसचिव म्हणून कार्यरत होते.