आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Riyad Hijab: Syrian Prime Minister's Defection Dents Edifice Of Syria's

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सिरियाचे पंतप्रधान बंडखोरांच्या तंबूत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दमास्कस - सिरियात एकीकडे लष्कर व बंडखोर अशी लढाई पेटलेली असतानाच राजकीय पातळीवर सोमवारी राजकीय पातळीवर उलथापालथ झाली आहे. दोन महिन्यांपूर्वी नियुक्ती करण्यात आलेले पंतप्रधान रियाद हिजाब फितूर झाले असून ते विरोधकांना जाऊन मिळाले आहेत. यामुळे गेल्या सतरा महिन्यांत राष्ट्राध्यक्ष बशर अल असाद यांना बसलेला हा सर्वात मोठा हादरा समजला जात आहे.
हिजाब यांनी असाद यांच्या फितुरी केल्याच्या वृत्ताला आणखी दुजोरा मिळाला नसला तरी सरकारी प्रसारमाध्यमातून हा दावा करण्यात आला आहे. सरकारमधील सर्वाेच्च स्थानी असलेल्या व्यक्तीने दगाफटका देण्याची ही सतरा महिन्यातील पहिलीच घटना आहे. हिजाब हे असाद सरकारमधील सुन्नी अल्पसंख्यांकाचे नेतृत्व करतात. त्यांचा मतदार संघ असलेला इशान्येकडील दिएर एझॉर भाग लष्कर व बंडखोर यांच्यातील युद्धभूमी बनली आहे.
हिजाब यांनी सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे, असा दावा सिरियातील घडामोडींचे निरीक्षण करणा-या ब्रिटनमधील मानवी हक्क संघटनेचे रमी अब्देल रहेमान यांनी केला आहे. हिजाब बाहेर पडल्यामुळे त्यांच्या जागी आता उपपंतप्रधान ओमर घालावांजी आले आहेत. हिजाब यांची हकालपट्टी करण्यात
आल्याचे सरकारी टीव्हीवरून सांगण्यात आले आहे. 46 हिजाब यांची 6 जून रोजी नियुक्ती करण्यात आली होती. दुसरीकडे हामा प्रांतातील लष्करी हल्ल्यात 40 जण ठार 120 जखमी झाले. बंडखोरांनी ताब्यात घेतलेल्या शेवटच्या प्रदेशावर कारवाई करण्यात येत असल्याचे सिरिया लष्कराने जाहीर केले होते. या घोषणेच्या दोन दिवसानंतर स्फोटाची ही घटना घडली. अलेप्पोमध्ये करण्यात आलेल्या कारवाईनंतर लष्कराने 20 हजारांचे मजबूत सैन्य दल राजधानीत तैनात केले.
दुसरीकडे सोमवारी सकाळी लष्कराने केलेल्या गोेळीबारात कोणाच्याही मृत्यूची घटना घडलेली नाही, असा दावा माहिती मंत्री ओमरान अल-झोआबी यांनी केला आहे. त्यानंतर 18 जुलै रोजी झालेल्या स्फोटात सुरक्षा यंत्रणेतील चार उच्च अधिकारी ठार झाले. हा हल्ला बंडखोर फ्री सिरियन आर्मीने केला होता.
टीव्ही केंद्रात स्फोट - सिरियाच्या सरकारी टीव्हीच्या मुख्यालयाची इमारत सोमवारी बॉम्बस्फोटाने हादरली. या घटनेत अनेक नागरिक जखमी झाले आहेत. प्राणहानीचे वृत्त नाही. हा स्फोट टीव्ही इमारतीच्या तिस-या मजल्यावर झाला. सरकारी प्रसारमाध्यमावरील हल्ल्याची ही पहिलीच घटना नाही.
हर्बनाफसावर बॉम्बफेक - हामा प्रांतातील हर्बनाफसा शहरावर सोमवारी सिरियन लष्कराने जोरदार हल्ला चढवला. बंडखोरांना चिरडण्यासाठी मोठ्या प्रमाणात बॉम्बवर्षाव केला. शहरावर रणगाडे व मोठा शस्त्रसाठा घेऊन लष्कराने चाल केली. सलग पाच तास गोळीबार व बॉम्बचे आवाज येत होते, असे बंडखोर गटाने म्हटले आहे. हर्बनाफसा शहरातील 11 नागरिकांचा मृत्यू झाल्याचा आरोप सिरियातील परिस्थितीचे निरीक्षण करणा-या ब्रिटनमधील मानवी हक्कविषयक संस्थेने म्हटले आहे. ठार झालेल्यांमध्ये पाच मुलांचाही समावेश आहे.