फोटो : अमेरिकेने ओबामाचा खात्मा करण्यासाठी पाठवलेल्या नेव्ही सील टीममध्ये रॉब ओनील यांचा समावेश होता.
न्यूयॉर्क - एकेकाळी जगातील सर्वात निर्घृण दहशतवादी असलेला अल कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेनला मारण्याच्या मोहिमेवर अमेरिकेने पाठवलेल्या नेव्ही सील कमांडोची ओळख जगासमोर आली आहे. 2 मे 2011 ला पाकिस्तानच्या अबोटाबादमध्ये लादेनला संपवण्यासाठी पाठवण्यात आलेलल्या अमेरिकेच्या या नेव्ही सील टीम सिक्स मधील लादेनला गोळ्या घालणा-या त्या कमांडोचे नाव आहे. रॉब ओनील. 38 वर्षीय रॉब या आठवड्यात फॉक्स न्यूजवर दिसणार असून या संपूर्ण अभियानाची माहिती ते स्वतः देणार आहेत.
अमेरिकेच्या मोंटानामध्ये लहानाचे मोठे झालेल्या ओनील यांचे नाव सर्वप्रथम SOFREP.com नावाच्या संकेतस्थळाने जगासमोर आणले होते. ही वेबसाईट लष्कराशी संबंधित लोकांसाठी काम करते. 16 वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त झालेले ओनील आता प्रेरणादायी भाषणे देतात. लष्करात त्यांनी 52 मेडल मिळवले आहेत. भाषण देण्यासाठी त्यांना ठरावीक मानधन दिले जाते. ओनील यांचे वडील टॉम यांनीही
आपला मुलगा मिशन ओसामामध्ये सहभागी झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. तर रॉबने आपल्याला सरकारकडून पेन्शन किंवा आरोग्य सेवाही मिळत नसल्याचे आरोप केले आहेत. 2011 मध्ये सीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार ओनीलला ओसामाशी संबंधित मिशन संदर्भात मोठ्या मोठ्या गप्पा मारल्याच्या आरोपावरून सील टीम सिक्समधून काढून टाकले होते.
पुढील स्लाइड्वर वाचा लादेनला ठार केल्याच्या मोहिमेबाबत...