वॉशिंग्टन - ओसामा बिन लादेनला मारण्याचा दावा करणारा अमेरिकेचा माजी नौसैनिक रॉबर्ट ओनिलची मुलाखत पहिल्यांदा मंगळवारी( ता. 11) फॉक्स न्यूज वाहिनीने प्रसारित केले. यात रॉबर्ट याने ओसामाच्या हत्यापासून ते
आपल्या खासगी जीवनासंबंधीचे विविध पैलू सांगितले आहे. मुलाखतीचा दुसरा भाग बुधवारी( ता. 12) प्रक्षेपण करण्यात येणार आहे.
मे 2011च्या मोहिमेवर जाण्यापूर्वी रॉबर्टने आपल्या वडिलांना कॉल केला होता. एक भावनिक पत्र आपली पत्नी आणि मुलांना लिहिले होते. लादेनवर तीन गोळ्या झाडल्या. यात त्याचा खात्मा झाला. आपण 9/11च्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या अमेरिकनचा बदला पूर्ण केला, असे त्याने फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.
पहिल्यांदा वाटले गद्दाफींना कैद करायचे...
2011 मध्ये रॉबर्टची टीम मियामीमध्ये डायव्हिंग ट्रेनिंग घेत होता.त्यावेळी त्याला नव्या ठिकाणी तैनातीचे आदेश मिळाले. पहिल्यांदा वाटले लीबियातील हुकूमशहा गद्दीफी याला कैद करायचे. पण आपणले मिशन दुसरेच आहे. हे नंतर कळाले. ते म्हणजे पाकिस्तानच्या अबोटाबादमध्ये लादेनचा खात्मा करण्याचा. नौसैनिकांची तुकडी अनेक वेगवेगळ्या गटात विभागली गेली.
परिवाराला लिहिले पत्र
रॉबर्ट ओनिलने मोहिमेवर जाण्यापूर्वी पत्र लिहून आपली पत्नी आणि मुलांची माफी मागितली होती. नोकरीमुळे तो घरी वेळ देऊ शकला नव्हता.
पिझ्झा डिलीव्हरी बॉय म्हणून काम करायचे रॉबर्ट
रॉबर्ट म्हणतो,की तो एकेकाळी पिझ्झा डिलिव्हरी करायचा. सेनेचा गणवेष त्याला खूप आकर्षित करत असे. नंतर त्याने अमेरिकेच्या सैन्यदलात नोकरी मिळवली.
आजही दुखी आहे
कोणती चांगली आणि वाईट कृती केली? या विचारलेल्या प्रश्नला उत्तर देताना रॉबर्ट म्हणाला, मिशन ओसामा यशस्वी झाल्याने मला त्याचा अभिमान वाटला आहे.