आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टेक्सास येथील कंपनीने इबोला विषाणूंचा फडशा पाडणारा रोबोट केला तयार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र : सॅन अँटोनिया येथील झेनेक्स कंपनीची निर्मिती
ह्युस्टन - टेक्सास येथील कंपनीने इबोलाचे विषाणू हेरून काही सेकंदांत त्यांचा नायनाट करणारा रोबोट तयार केला आहे. रुग्णालयांमधील खोल्या स्वच्छ करण्यासाठी हा रोबोट तयार केला असून तो केवळ पाच मिनिटांत एक खोली स्वच्छ करून देतो. ‘लिटिल मोए’ नावाचा हा रोबोट इबोला विषाणूंचे डीएनएला अतिनील किरणांद्वारे नष्ट करतो. मात्र मानवी शरीरावर या किरणांचा दुष्परिणाम होत नसल्याची खात्री झेनेक्स कंपनीतर्फे देण्यात आली आहे. सध्या अमेरिकेतील अडीचशे रुग्णालयांत तो वापरला जात आहे. तसेच या लिटिल मोएमुळे ५० टक्के संक्रमण घटले असल्याचे रुग्णालय प्रशासनानेही मान्य केले आहे.

ही आहेत वैशिष्ट्ये
> ५ मिनिटांत रुग्णालयातील खोली जंतूमुक्त.
> विषाणू नष्ट करण्यासाठी दर १.५ सेकंदाला तीव्र किरणांचा मारा
> अमेरिकेतील २५० रुग्णालयांत ही मशीन वापरली जात आहे.
> मानवी शरीरावर दुष्परिणाम नाही

स्पेनमध्ये पहिला रुग्ण, युरोपियन संघ धास्तावला
स्पेनमध्ये इबोलाचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर युरोपियन युनियनने याबाबत स्पष्टीकरण मागितले आहे. स्पेनमधील एका नर्सला इबोलाचा संसर्ग झाला असून ती इबोलाग्रस्त मिशनरीजवर उपचार करणा-या पथकात सहभागी होती. स्पेनमधील माद्रिद प्रांतातील रुग्णालयात या नर्सला वेगळ्या विभागात ठेवले आहे. दरम्यान, अमेरिकेतही पहिला रुग्ण आढळल्यामुळे तेथे १७ सदस्यांचे स्पेशल टास्क फोर्स तयार केले असून ही टीम इबोलाविरोधात लढण्यासाठी विस्तृत योजना तयार करेल.