टोकिओ - तुम्हाला रोबो, लेझर-फ्लॅशिंग लाइट्ससह डान्स करताना एका रेस्तरॉंमध्ये दिसत आहेत. ते दृश्य आहे जपानची राजधानी टोकिओ येथील रोबो रेस्तरॉंचे. टोकिओ क्लबमध्ये हा रेस्तरॉं कर्णकर्कश कॅब्रे शोसाठी प्रसिध्द आहे. रोबो रेस्तरॉं एक कोटी डॉलर ( 60 कोटी रूपये) खर्चून बांधण्यात आले. फरशीपासून ते छतापर्यंत सगळीकडे लाइट्स लावण्यात आल्या आहेत. रोबो कॅब्रे शो हा या रेस्तरॉंमधील मुख्य आकर्षण आहे. या शोच्या दरम्यान रोबोंचे मुष्टियुध्द, रोबो टँकवर नृत्य करताना सर्व रेस्तरॉंमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कसरती उपस्थितांना दाखवले जाते.
पुढील स्लाइड्समध्ये पाहा आपल्या हटके शोसाठी प्रसिध्द असलेल्या रोबो रेस्तरॉंची छायाचित्रे.....