आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रोबोटिक झाडाच्या मुळांची वाढ होणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - यंत्र मानवाचे अनेक अवतार सर्वांनीच पाहिले आहे. परंतु रोबोटिक झाड येऊ घातले आहे. नैसर्गिक झाडासारखीच त्याचीही मुळे वाढणार आहेत.

इटालियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (गिनोआ) संस्थेने अशा प्रकारचे रोबोटिक झाड विकसित केले आहे. बार्बरा मॅझोलाइ यांच्या नेतृत्वाखालील टीमने असा दावा केला आहे. झाडाला सेन्सर आहेत. त्याच्या साह्याने झाडाची जमिनीखाली वाढ होणे शक्य आहे. जमिनीची धूप होते तेव्हा कोणत्याही वेगळ्या घटकाच्या मदतीशिवाय झाडांची वाढ होऊ शकते. या कृत्रिम झाडामध्ये गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध घेणे, पाणी, तापमान हे घटक जाणून घेण्याचीही क्षमताही आहे.