आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rocket Attack Kills Dozens At Wedding Party In Afghanistan

लग्नघरी पसरली स्मशान शांतता: लग्नमंडपावर रॉकेट कोसळल्याने 28 वर्‍हाडी ठार, 80 जखमी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काबूल- अफगाणिस्तानातील हेल्मंड प्रांतात एका लग्नमंडपावर रॉकेट कोसळल्याने 28 वर्‍हाडींचा मृत्यु झाला असून 80 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्‍यात आले आहे. बुधवारी ही दुदैवी घटना घडली. अफगाणिस्तानचे सैनिक आणि तालिबान्यांमध्ये युद्ध सुरू होते. त्यातील एक रॉकेट लग्न सोहळ्यावर कोसळले. अफगाणिस्तानात अमेरिका आणि नाटो सेनेच्या युद्धाचा हा शेवटचा दिवस होता.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अफगाणिस्तानचे सैनिक आणि तालिबान्यांमध्ये युद्ध सुरू असताना एक रॉकेट हेल्मंड प्रांतातील सानगिन जिल्ह्यातील एका लग्नमंडपावर कोसळले. या दुर्घटनेत 28 जणांचा मृत्यु झाला असून 80 जण गंभीर जखमी झाले आहेत. जवळपास नऊ मुले बेपत्ता असल्याची माहिती काउंसिलचे सदस्य बशीर अहमद शकीर यांनी दिली.

रॉकेट पडल्याने लग्न घरातील आनंदी वातावरण दु:खात बदलल्याचे अब्दुल हलीम यांनी सांगितले. अब्दुल हलीम यांच्या भाचीचे लग्न होते.

पुढील स्लाइड्‍सवर पाहा छायाचित्रे...