आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रोबोटच्या 78 बोटांनी गिटार, 22 हातांनी ड्रमचा ढणढणाट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - रॉकस्टार रोबोट्स, असे ऐकायला भलेही विचित्र वाटेल, परंतु हे नवे वास्तव आहे. लवकरच रोबोट्सच्या बँडचा म्युझिक अल्बम लाँच होणार आहे. बँडमध्ये विशेष आहे गिटारिस्ट रोबोट, 78 बोटांचा हा रोबोट माणसापेक्षा अनेकपट वेगाने गिटार वाजवतो. ड्रमरला 22 हात आहेत. तीन रोबोट्स या बँडचे नाव-जेड मशिन्स आहे. रोबोट बँडचे निर्मात्यांनी रेकॉर्डिंग आर्टिस्ट स्कवायर पुशरच्या मदतीने रोबोट्सच्या संगीताची रचना केली. या अल्बममध्ये पाच गाणी आहेत.
रेकॉर्डिंग आर्टिस्ट स्कवायर पुशरनुसार संगीत रचना करणार्‍या रोबोट्समुळे अनेक सुविधा आहेत. परंतु त्यांच्याही विविध सुविधा आहेत. उदाहरणार्थ रोबोट गिटारिस्ट 78 बोटांनी मोठय़ा वेगाने गिटार वाजवतो, परंतु त्याचे अँम्प्लिट्यूडवर नियंत्रण नसते.

वेगाने थिरकणार बोटे
गिटारिस्टची 78 बोटे म्हणजे गिटावर त्याचा हात एवढय़ा वेगाने चालेल, जेवढय़ा वेगाने माणसाची बोटी चालू शकणार नाहीत. असेच ड्रमरच्या बाबतीत आहे. 22 हातांसह तो मोठय़ा वेगाने ड्रमला वाजवतो.