आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Romance And Mystery: How \'bland\' Hollande Hooked Glamorous Beauty

फ्रान्स राष्ट्राध्यक्षांच्या खासगी आयुष्यात वादळ, गर्भवती आहे नवी प्रेमिका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पॅरिस- फ्रान्सचे राष्ट्रपती फ्रांसुआ औलांद यांनी मान्य केले आहे, की त्यांच्या खासगी आयुष्यात वादळ आले आहे. दुसरीकडे, एका वृत्तवाहिनीने दावा केला आहे, की औलांद यांची नवी प्रेमिका ज्यूलिया चार महिन्यांची गर्भवती आहे. एम6 टीव्ही वृत्तवाहिनीने एका ब्लॉगरच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. ब्लॉगर ली रियल यांच्या दाव्यानंतर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. वृत्तवाहिनीच्या प्रवक्त्यानेही यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.
गेल्या आठवड्यात 'क्लोजर' मॅगझीनद्वारा औलांद यांच्या नव्या प्रेमप्रकरणाचा खुलासा झाल्यानंतर त्यांची प्रेमिका व फ्रान्सची प्रथम महिला वेलेरी ट्रियरवीलर यांना जबर धक्का बसला होता. ट्रियरवीलर यांना तर रूग्णालयातच दाखल करावे लागले होते. औलांद यांना याप्रकरणी माफ करावे असे त्यांनी सांगितले. मात्र राष्ट्राध्यक्ष औलांद यांनी पत्नीची माफी मागितली नाही हा भाग वेगळा आहे.
असे पहिल्यांदा घडले नाही, की औलांद महिलांमुळे अडचणीत आले आहेत. औलांद यांना ओळखणारे म्हणतात, की आम्ही समजू शकत नाही राष्ट्राध्यक्ष यांच्यात असे काय आहे ज्यामुळे सुंदर, आकर्षक व समजुतदार महिला त्यांच्या प्रेमात पडतात. एकोल नॅशनल एडमिनिस्ट्रेशन (ईएनओ)च्या लेक्चर हॉलपासून ते देशाच्या शिखर संमेलनापर्यंत औलांद यांचे राजकीय जीवन प्रेमाने सदा बहरलेलेच राहिले आहे.
मंगळवारी औलांद यांच्या राजकीय जीवनातील एक महत्त्वाचा टप्पा होता. तब्बल 500 पत्रकारांनी जेव्हा प्रथम महिला यांच्याबाबत प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी सांगितले की, देशाची प्रथम हिला कोण असेल याबाबत उत्तर अमेरिका दौ-याआधी सांगितले जाईल. औलांद 11 फेब्रुवारीला अमेरिका दौ-यावर जात आहेत. औलांद यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले की, औलांद यांची आज जी काही परिस्थिती झाली आहे त्याला ते स्वत: जबाबदार आहेत.
पुढे वाचा, कोणा-कोणासोबत औलांद यांचे राहिले संबंध...