आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तलावावर बर्फाचे हॉटेल, विवाह इच्छूक जोडप्यांसाठी अनोखे ठिकाण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुकारेस्ट - युरोपमधील रोमानिया या देशातील फेगारसच्या पर्वतांवर विवाह करणा-या जोडप्यांसाठी अनोखे चर्च आणि हॉटेल तयार करण्‍यात आले आहेत. वास्तवात येथे मोठ्याप्रमाणावर हिमवर्षाव होत आहे. अशा स्थितीत समुद्र तळापासून सुमारे 67 हजार फुट उंचावर असलेल्या बालिया तलावावर पडलेल्या बर्फाच्या पर्वते कापून बर्फाचे चर्च आणि भव्य हॉटेलची निर्मिती करण्‍यात आली आहे. रोमानियातील एक संस्था मागील 5 वर्षांपासून चर्च आणि हॉटेलची निर्मित आयस(बर्फ) आर्टिस्‍टकडून करुन घेत आहे. प्रत्येक वर्षी येथे हजारो संख्‍येने लोक देश-विदेशातून रोमानियात येत असतात.

एक सामान्य हॉटेलप्रमाणे व्यवस्था
हॉटेलमध्‍ये पर्यटकांना थांबवण्‍यासाठी व्यवस्था करण्‍यात आली आहे. येथे झोपण्‍यासाठी पलंग, बसण्‍यास खुर्च्या आणि टेबलची व्यवस्था करण्‍यात आली आहे.ही सर्व बर्फानेच तयार करण्‍यात आली आहेत. तसेच ते वॉटर प्रूफ‍िंग असतात. यामुळे कपडे ओले होत नाही.

फॅक्ट्स
* येथील तापमान उणे दोन डिग्री सेल्सिअस खाली असते.
* हॉटेलमध्‍ये एकूण 12 रुम्स आहेत.
* बर्फा व्यतिरिक्त काचेचाही वापर करण्‍यात आला आहे.

पुढे पाहा बर्फाने बनवण्‍यात आलेला हॉटेल...