आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rome Restaurant Serves Up New Attitude Towards Down Syndrome

या रेस्तरांमध्ये काम करतात मानसिकदृष्ट्या कमकूवत वेटर, जगभरात चर्चेत आहे हे रेस्तरां

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इटलीची राजधानी रोममध्ये आता एक असे रेस्तरां सुरू झाले आहे जेथे सर्व वेटर्स हे मानसिकदृष्ट्या कमकूवत आहेत.
हे रेस्तरां या मुलांच्या पालकांनी सुरू केले आहे. या रेस्तरॉँचे नाव जरासोल असून येथे 31 कर्मचारी असून त्यापैकी 18 लोक हे शारिरीक किंवा मानसिकद्ष्ट्या विकलांग आहेत.
या पैकी काही जण ऑटिज्म तर काही जण स्कीजोफ्रेनिया ग्रस्त आहेत. या कल्पनेला चांगलीच प्रसिद्धी मिळत आहे. यापैकी नऊ वेटर्स रेगुलर आहेत. हे रेस्टरां सुरू होउन काही महिनेच झाले आसतानाही येथे ग्राहकांची गर्दी पाहायला मिळते. येथे ग्राहक आल्यानंतर त्याला फूल देऊन त्याचे स्वागत केले जाते.
सामाजिक संघटनानी उचलले पाउल
गेल्या वर्षी आलेल्या मंदी नंत रइटलीतील कित्येक व्यावसायिकांना त्यांचे रेस्तरां बंद करावे लागले होते. यानंतर इटलीतील सोशल कोऑपरेटीव्ह असोशिशन या सामाजिक संस्थेने काही तरी वेगळे करण्याचा विचार केला. या संस्थेचे अध्यक्ष कोसोंरजियो सिंटेसी यांनी या अगोदरही विकलांग लोकांना नोकरी मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले आहेत.
इटलीतील तिन मोबाइल कंपन्यानाही कोसोंरजियो सर्विस देतात. त्यांनी इटलीतील मानसिकदृष्ट्या कमकूवत असणा-या लोकांच्या पालकांशी सपर्क साधून त्याच्या समोर रेस्तरांची कल्पना मांडली. सर्व पालकांनी मिळून पैसे एकत्र केले आणि हे रेस्तरां सुरू झाले. या रेस्तरॉमध्ये आज त्यांचे मानसिक कमकूवत असणारी मुले सर्वीस देतात.
पुढील स्लाइडवर पाहा या रेस्तरॉँमध्ये मानसिक दूर्बल असणारे वेटर्स कसे काम करतात...