आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रुनीची हिरेजडित बाइक विक्रीला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - इंग्लंडचा फुटबॉल स्टार वेन रुनीने डिझाइन केलेली हिरेजडित बाइक लिलावात काढण्यात आली असून पुढील आठवड्यात होणा-या धर्मादाय लिलावात तिला सुमारे 51 लाख रुपये (60 हजार पाउंड्स)इतकी किंमत मिळण्याची शक्यता आहे. 20 फेब्रुवारी रोजी चेस्टर येथे बॉनहॅम्स लिलावात ही 2012 ची लॉग जेन्सन बाइक ठेवण्यात येणार आहे. आजारी मुलांना आर्थिक साहाय्य देणा-या किड्सएड या डॅनिश धर्मादाय प्रतिष्ठानसाठी या लिलावातून 51 लाख रुपयांचा निधी उभा राहण्याची अपेक्षा आहे. क्रुझरच्या शैलीतील बाइकचे डिझाइन प्रसिद्ध स्ट्रायकर वेन रुनीने केले असून लॉग जेन्सन या डॅनिश कंपनीने तिची निर्मिती केली आहे.

‘वेन रुनी लॉग जेन्सन’ या बाइकच्या डिझाइनमध्ये सहभागी होण्याचा आनंदच काही और आहे, असे वेन रुनीने म्हटले आहे.
वैशिष्ट्ये : पेट्रोल टँकवर रुनीने स्वाक्षरी केलेले ठड.10 फुटबॉल टी-शर्ट, 21 काळ्या आणि एका टीडब्ल्यू/व्हीएस हि-या ने जडवलेला खास शिफ्ट रॉड, 2011 मध्ये मँचेस्टरसिटीमध्ये रुनीने केलेल्या गोलनंतरच्या जल्लोषाचे आर्टवर्क असलेले रिअर मडगार्ड ही या बाइकची खास वैशिष्ट्ये आहेत.