आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केट-विल्यम पुत्राचे नाव प्रिन्स जॉर्ज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- विल्यम-केट मिडलटेन शाही दांपत्याच्या युवराजाचे नाव प्रिन्स जॉर्ज असे ठेवण्यात आले आहे. त्याचे पूर्ण नाव प्रिन्स जॉर्ज अलेक्झांडर लुईस ऑफ केम्ब्रिज असे असेल. बुधवारी केसिंग्टन पॅलेसमधून ही घोषणा झाली. ब्रिटनमध्ये आजवर जॉर्ज नावाचे सहा राजे झाले आहेत. मंगळवारी बकिंगहॅम पॅलेसमध्ये राणी एलिझाबेथ यांच्या उपस्थितीत शाही मेजवानी देण्यात आली होती. सोमवारी युवराजाचे जगात आगमन झाले. ब्रिटिश राजघराण्यात युवराजांना पूर्वजांची नावे देण्याची परंपरा आहे.