आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rubble Bucket Challenge In Gaza Like Ice Bucket Challenge, Divya Marathi

आइस बकेटनंतर आता रबल बकेट चॅलेंज स्पर्धा, पाहा गाझावरील भयावह स्थिती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गाझा - भयावह एएलएस आजारावर संशोधन वेगाने व्हावे यासाठी जगभर सध्‍या 'आइस बकेट चॅलेंज' जोरात चालू आहे. यात जगभरातील सेलिब्रिटिज सहभाग घेत आहेत. दुसरीकडे गाझाच्या लोकांनी आपली परिस्थिती इतर लोकांना कळावे यासाठी एक वेगळी शक्कल लढवली आहे. स्पर्धेत ठंड पाण्‍याची बादली ओतली जाते. तिथे गाझाचे लोक स्वत:वर पडलेल्या घरांच्या डबरची बादली स्वत: वर ओतून घेत आहेत.
पॅलेस्टिनी पत्रकार अॅलन अल अलोलने ' रबल बकेट चॅलेंज( डबर डोक्यावर आतणे.) चा पहिला व्हिडिओ इंटरनेटवर अपलोड केला आहे. गाझापट्टीवरील हालाखीची परिस्थिती लोकांना या माध्‍यमातून दाखवण्‍याचा उद्देश आहे, असे अॅलन यांनी सांगितले. इस्रायलच्या क्षेपणास्त्र आणि तोफगोळांच्या मा-यामुळे गाझापट्टी उदध्‍वस्त झाले आहे. आयस बकेट चॅलेंजची व्हायरल व्हिडिओ पाहुन लोकांना रबल बकेटची कल्पना सूचली आहे.
रबल बकेट चॅलेंज स्पर्धेचा पहिला व्हिडिओ सोमवारी ( ता. 25) फेसबुकवर अपलोड करण्‍यात आला. यास आतापर्यंत 2 हजार लोकांनी लाइक केले आहे. व्हिडिओ पाहुन लोकांना गाझावरील वास्तव स्थिती कळावी आणि मदत करावी अशी अॅलन याची इच्छा आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा रबल बकेट चॅलेंजची छायाचित्रे .....