आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ruins Of Gaza Yasser Arafat International Airport

PHOTOS : गाझाच्या एकमेव विमानतळाचे झाले वाळवंटात जमा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो-हल्ल्यामुळे गाझाच्या आंतरराष्ट्रीय विमातळाची अशी अवस्था झाली.)

रफा - गाझाच्या रशा शहरात यासीर अराफत आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनानंतर काही वर्षांतच त्याचा विनाश सुरू झाला आहे. आता याठिकाणी केवळ अवशेष शिल्लक असल्याचे दिसत, असून तेही वाळवंटात नामशेष होत चालले आहेत. गाझाला जगभराशी जोडणा-या या विमानतळाची निर्मिती 1998 मध्ये लाखो डॉलरच्या विदेशी मदतीद्वारे झाली होती. इजिप्त, जपान, सौदी अरब, स्पेन, जर्मनी आणि इतर युरोपीय देशांनी याच्या निर्मितीसाठी मदत केली होती.
हे विमानतळ म्हणजे पॅलिस्टीनच्या राज्याचे एक शक्तीशाली प्रतिक होते. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनी त्याचे उद्घाटन केले होते. त्यावेळी येथील पहिले उड्डाण पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. 10 हजाराहून अधिक प्रवासी या विमानतळाचा वापर करायचे. पण युद्धजन्य स्थितीमुळे तीन वर्षांपासून हे विमानतळ बंद पडले होते.

इस्राइल आणि गाझा यांच्यात पुन्हा भडकलेल्या हिंसेमुळे या विमानतळाचा पूर्णपणे विनाश झाला आहे. हल्ल्यात आधी या विमानतळाचे टॉवर आणि मग रनवेही पूर्णपणे उध्वस्त झाले आहे. डिसेंबर 2001 मध्ये चार इस्रायली सैनिकांच्या मृत्यूचा बदला म्हणून इस्राइलने बुलडोझरने हे विमानतळ पूर्णपणे उध्वस्त करून टाकले होते. त्यानंतर इस्राइलने एफ-16 जेटने बॉम्बहल्ले करत विमानतळाचे रडार सेंटर आणि कॅमेरा सेक्युरिटी सिस्टमही उध्वस्त केली होती.
पॅलिस्टीनी नेत्यांनी नुकसान कमी करण्यासाठी अनेकदा हे विमानतळ पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्नही केला होता. पण इस्राइलने नेहमी त्यात अडथळे आणले. नुकत्याच काहिरा येथे झालेल्या चर्चेचही विमानतळाचा मुद्दा महत्त्वाचा होता.

पुढील स्लाइड्सवर पाहा.. गाझाच्या या उध्वस्त विमानतळाचे PHOTOS