आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत्यू झाल्यावर नक्कीच सांगेन- जॅकी चॅन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क - विख्यात हॉलीवूड अभिनेता जॅकी चॅन भारतात चिनी चित्रपट महोत्सवात सहभागी होण्यास गेल्यानंतर अमेरिकेत त्याच्या मृत्यूच्या ऑनलाइन अफवेचे पेव फुटले. ही बाब समजल्यानंतर त्याने फेसबुकवर निवेदन केले. त्याने लिहिले की, मंगळवारी पहाटे तीन वाजता मी भारतातून बीजिंगला आलो. मला प्रवासात झोप मिळाली नाही त्यामुळे घरही स्वच्छ करता आले नाही. अनेकांनी मला मृत्यूच्या अफवेची माहिती दिली. त्यातील बºयाच जणांनी मी जिवंत असेल तर मला पाहण्याची इच्छा व्यक्त केली आहे. माझा मृत्यू झाल्यानंतर मी ते जगाला नक्कीच सांगेन. या काळात माझी चिंता व्यक्त करणाºयांचे मी आभार मानतो. माझे सर्वांवर प्रेम आहे. चॅनने चीन चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन करण्यासाठी नुकताच भारत दौरा केला होता. चॅन दिग्दर्शित ‘द चायनिज झोडॅइक’ चित्रपटाने महोत्सवाची सुरुवात झाली.