आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rupert Murdoch Wife Deng And Britain Former PM Blair Spent Nights Together

\'ब्रिटनच्या माजी पंतप्रधानांनी रुपर्ट मर्डोक यांच्या पत्नीसोबत घालवल्या तीन रात्री\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माध्यम सम्राट रुपर्ट मर्डोक यांची पत्नी वेंडी डेंग यांच्या पत्राने ब्रिटीश राजकारणामध्ये खळबळ उडवून दिली आहे. या पत्राच्या आधारे ब्रिटीश वृत्तपत्रांनी खुलासा केला आहे की, मर्डोक यांची पत्नी डेंग आणि ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांच्यात अनैतिक संबंध होते. या वृत्तामध्ये म्हटले आहे की, 'डेंग यांनी मर्डोक यांच्या गैरहजेरीत स्वतःच्या घरातच ब्लेअर यांच्यासोबत तीन रात्री घालवल्या होत्या. पत्नीच्या गैरपुरुषासोबतच्या संबंधाची माहिती मिळाल्यानंतर मर्डोक यांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. डेंग-ब्लेअर यांच्या अनैतिक संबंधामुळे मर्डोक आणि ब्लेअर यांच्या संबंधातही दुरावा निर्माण झाला.' टोनी ब्लेअर यांनी हे खुलासे म्हणजे निव्वळ अफवा असल्याचे सांगत प्रतिक्रीया देण्यास नकार दिला आहे.
ब्रिटनचे वृ्त्तपत्र लंडन मेल मध्ये प्रकाशित वृत्तानुसार, रुपर्ट मर्डोक यांच्या माजी पत्नीने एका पत्रात टोनी ब्लेअर यांच्याबद्दलच्या कोमल भावनांना वाट मोकळी करुन दिली होती. डेंग आणि मर्डोक यांच्या घटस्फोटाआधी हे पत्र लिहिले गेले होते.