आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Russia Cleans Up After Meteor Blast Injures More Than 1,000

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उल्कापाताने रशियाच्या गोठलेल्या सरोवरात ‘लोणार’ सारखा खड्डा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मॉस्को- रशियाच्या युरल्स प्रांतात आलेली उल्का चेलियाबिन्स्क शहरातील गोठलेल्या सरोवरात पडली.त्याठिकाणी आता बुलढाण्याजवळील लोणार सरोवरासारखा खड्डा पडला आहे.सहा गोताखोरांनी या खड्ड्यात व जवळच्या भागात उल्कापाताचे अवशेष शोधण्याच्या प्रयत्न केला. त्यांनी बर्फातील खड्ड्याच्या खोलवर डुबकी घेत शोध घेतला संपूर्ण प्रांतात 9 हजार कामगार अवशेष शोधण्याचे काम करीत होते; परंतु अद्याप काही आढळलेले नाही. यामुळे सुमारे 50 एकर परिसरातील 4 हजार इमारतींचे नुकसान झाले असून 179 कोटींचा फटका रशियाला बसला आहे. जखमींची संख्याही 1200 वर गेली आहे. यात 200 मुले आहेत. चेलियाबिन्स्क शहर हे लष्करी व औद्योगिक शहर असून या ठिकाणी अणुप्रकल्पही आहेत.

दहा टनाची उल्का
ताशी 54 हजार किलोमीटर ताशी वेगाने आलेली ही उल्का चेबरकुल या गोठलेल्या सरोवरात पडली. दहा टन वजनाच्या उल्कापाताने या सरोवराचा प्रचंड जाड बर्फ भेदला. त्यामुळे सरोवरात 20 फूट व्यासाचा खड्डा पडला आहे.

अवकाशात काय घडले
प्रचंड वेगात निघालेली ही उल्का सकाळी 9.20 च्या सुमारास पृथ्वीच्या कक्षेत आली आणि सुमारे 50 कि.मी.उंचीवर असतानाच तिचे तुकडे झाले. असे रशियन शास्त्रज्ञांनी सांगितले,तर अमेरिकी संस्था ‘नासा’च्या मते अंदाजे 24 कि.मी.उंचीवर असताना तिच्या ठिक-या उडाल्या असाव्यात.

लघुग्रह कोसळला,नासाचा दावा
रशियात पडलेली उल्का नसून लघुग्रह होता.त्याचा आकार 49 फूट म्हणजे दोन कारच्या आकाराएवढा होता. 18 कि.मी.प्रतिसेकंद (ताशी 64,800 कि.मी.वेग)वेगाने आला.पृथ्वीच्या वातावरणात आल्यामुळे त्याला लागलेली आग 30 सेकंद दिसली. सन 1908 नंतर सैबेरियात प्रथमच उल्कापात झाला असे नासाने म्हटले आहे.

हिरोशिमापेक्षा 30 पट अधिक ऊर्जा
विजेच्या वेगाने आलेली ही उल्का चेलियाबिन्स्क शहरातील सरोवरात पडताच कानठळ्या बसवणारा स्फोट झाला व अख्खे शहर हादरले.त्यातून निघालेली ऊर्जा हिरोशिमातील अणूबॉम्ब तुलनेत 30 पट अधिक म्हणजे 300 ते 500 टन आहे. स्फोटानंतर शहर क्षणभर लख्ख प्रकाशाने उजळून निघाले होते.

अमेरिकेची चाचणी?
रशियात उल्कापात झाला नसून चमक लेला प्रकाश आणि हादरे अमेरिके च्या शस्त्रास्त्र चाचणीमुळे बसले.
व्लादीमीर झिरिनोस्की , संसद सदस्य ,रशिया