आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FUTURE TRANSPORT: रशियात धावणार सर्वाधिक वेगवान ट्राम, पाहा छायाचित्रे...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रशियाची नवी ट्राम कोणत्याही विज्ञान कथेवर आधारित चित्रपटापेक्षा कमी नाही. या आकर्षक ट्रॉमचे डिझाइन युव्हीझेडने केले आहे. अ‍ॅलेक्सी मास्लोव त्याचे डिझाइनर आहेत. ट्रामला रशिया वन ( आर वन) असे नाव देण्‍यात आले आहे. पुढील 20-50 वर्षांचा विचार करून त्याचे डिझाइन करण्‍यात आले आहे.
अ‍ॅडव्हान्स तंत्रज्ञान आणि कम्पोझिट मटेरियल वापरण्‍यात आल्याने आर वनचे प्रत्येक पॅनल सहज बदलले जाऊ शकते. ट्रामच्या इंजिनाचा दर्शनीभाग टोकदार असल्याने चालकाला पुढील रस्ता स्पष्‍ट दिसेल. अपघात होणार नाही. बॅटमोबाइल (कॉमिक सुपरहिरो बॅटमॅन वापरत असलेली कार) सारखी दिसणारी ट्राम बाहेरून जितकी अ‍ॅडव्हान्स्ड दिसते ति‍तढी अंतर्गतही आहे. वाय-फाय, जीपीएस आणि वैशिष्‍ट्यपूर्ण एलईडी लायटिंगमुळे अंतर्गत सजावटीच्या सौंदर्यात भर पडते. एलईडी लायटींग वातावरणानुसार बदलते.

ही आहेत वैशिष्‍ट्ये...
डायनॅमिक एलईडी लायटींग व्यतिरिक्त एअर कंडीशन, अँटी बॅक्टेरियल हँड रेलिंग, मोबाइल चार्ज करण्‍यासाठी युएसबी 3.0 पोर्ट आदी सुविधा उपलब्घ आहेत. आर वन एक भन्नाट कॉन्सेप्ट आहे. ती रशियाच्या रूळावर प्रत्यक्षात 2015 पासून धावेल.

पुढील छायाचित्रांमध्‍ये पाहा भविष्‍यातील ट्राम...