आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Russia News In Marathi, Ukraine Mobilises After Putin Declaration Of War

रशियाने तैनात केल्या युद्धनौका, युक्रेनच्या पंतप्रधानांची युद्धाची घोषणा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कीव (युक्रेन)- युक्रेनमध्ये रशियाकडून करण्यात आलेल्या लष्करी घुसखोरीचे गंभीर आर्थिक परिणाम भोगावे लागतील, असा इशारा अमेरिकेने दिल्यानंतर युक्रेनही युद्धासाठी सज्ज झाला आहे. रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनमधील घडामोडींमध्ये हस्तक्षेप करण्याची घोषणा केल्यानंतर युक्रेनने अॅलर्ट जारी केला आहे. शीतयुद्धानंतर पहिल्यांदाच युक्रेन प्रकरणावरून पश्चिमेकडील देश आणि रशियातील संबंध तणावपूर्ण झालेले आहे.
युक्रेनचे माजी पंतप्रधान व्हिक्टर यानुकोविच देश सोडून पळाल्यानंतर आर्सेनी यातसेनियुक यांनी पंतप्रधानपदाची जबाबदारी स्वीकारली आहे. त्यांनी इशारा दिला आहे, की मी युद्धाची घोषणा करीत आहे. युक्रेन यासाठी तयार आहे. रशियाने हा इशारा गांभिर्याने घ्यावा.
युक्रेनमध्ये राहत असलेल्या रशियन नागरिकांच्या सुरक्षेसाठी लष्कर पाठविण्याचा प्रस्ताव ब्लादिमीर पुतिन यांनी रशियाच्या संसदेत ठेवला आहे. यासोबत पश्चिमेकडील देशांनी या प्रकरणी हस्तक्षेप करू नये, असेही ठामपणे सांगितले आहे.
युक्रेनचे स्वशासित गणराज्य क्रीमियात रशियाने आपले लष्कर पाठविले आहे. येथे रशियाचे नौदल आणि वायुदल बेसही आहेत. रविवारी रशियाच्या सैनिकांनी युक्रेन सैनिकांच्या छावण्यांना घेरले होते. त्यांनी शरणागती पत्करावी, असा आदेश देण्यात आला होता. परंतु, अद्याप कोणत्याही प्रकरणाच्या हल्ल्याचे वृत्त नाही.
अमेरिकेने दिला इशारा
युक्रेनमध्ये रशियाने लष्कर पाठविण्याच्या निर्णायवर अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. याचे रशियाला भविष्यात गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही दिला आहे.
पुढील स्लाईडवर फोटोंमध्ये बघा रशियाने कशी केली लष्करी कारवाई....