आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Russia President Vladimir Putin Unfazed By Topless Protesters In Germany

PHOTOS : रशियाच्या राष्ट्राध्यक्षासमोर टॉपलेस झाल्या युवती, पुतिनांनी लुटली मजा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बर्लिन- रशियाचे राष्‍ट्राध्यक्ष व्‍लादि‍मीर पुतिन सध्या जर्मनी देशाच्या दौ-यावर असून, सोमवारी त्यांच्यासोबत एक अजब घटना घडली. जर्मनीच्या चान्सलर एंजेला मार्केल यांच्यासोबत पुतिन जात असताना त्यांच्यापुढे अचानकपणे दोन टॉपलेस महिला आंदोलकांनी "F-- dictator" असे ओरडण्यास सुरुवात केली. मात्र क्षणभर गोंधळलेल्या पुतिन यांना काही वाईट वाटले नाही उलट त्यांना आपल्या हक्कासाठी लढणा-या महिलाचे टॉपलेस आंदोलन पसंत पडले. तसेच त्यांच्या चेह-यावरुन ते आंदोलनाची त्यांनी मजा लुटल्याचे दिसून आले. युरोप, अफ्रिका, अमेरि‍केसह अनेक देशांत महि‍ला अधि‍कारांबाबत काम करणा-या फेमेन या संस्थेने सदर घटनेची जबाबदारी घेतली आहे. हा तोच फेमेन ग्रुप आहे ज्याने 4 एप्रिलपासून ट्यूनेशि‍या येथील 19 वर्षीय अमिनाला वाचविण्यासाठी जगभर टॉपलेस जि‍हाद आंदोलनाची घोषणा केली होती.