आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायुक्रेन संकट आणि क्रिमियातील हस्तक्षेप पाहता रशियाला जी-8 या समूह राष्ट्रांतून बाहेर काढण्यात आले आहे, अशी माहिती फ्रान्सच्या परराष्ट्र मंत्र्याने दिली आहे.
फ्रान्सचे परराष्ट्र मंत्री लॉरेंट फेबियस यांनी मंगळवारी एका मुलाखतीमध्ये सांगितले, की जी-8 समूहाने रशियाची भागिदारी संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतला आहे. रशिया सोडून इतर सात देश एकजुटीने राहतील. यापूर्वी क्रीमिया मुद्द्यावर अमेरिका, युरोपीय संघ आणि जपान यांनी रशियावर कडक निर्बधांची घोषणा केली आहे.
क्रीमियाला रशियामध्ये सहभागी करण्याच्या संदर्भात गेल्या काही दिवसांपासून पाश्चिमात्य देश रशियाचा विरोध करत आहेत. युक्रेनच्या नवीन सरकारने या सार्वमत निर्णयाला 'सर्कस' संबोधले होते आणि रशियाच्या दबावाखाली हा निर्णय झाल्याचे सांगितले होते.
काय घडले क्रीमियात
युक्रेनच्या स्वायत्त असलेल्या क्रिमिया प्रांतात झालेल्या सार्वमतात 95.5 टक्के लोकांनी रशियात सामील होण्याचा कौल दिला होता. युक्रेनपासून वेगळे होऊन रशियन फेडरेशनमध्ये सामील होण्यासाठी क्रिमिया आता औपचारिक विनंती करण्याच्या मार्गावर आहे. तर, दुसरीकडे पाश्चिमात्य देश रशियावर नव्याने निर्बंध लादण्याच्या तयारी आहेत.
युरोपियन संघाने सार्वमत बेकायदा असल्याची टीका केली आहे. त्यातील निकालास मान्यता देणार नसल्याचेही स्पष्ट केले आहे. ब्रुसेल्समध्ये होत असलेल्या युरोपियन देशांच्या परराष्ट्र मंत्र्याच्या बैठकीत रशियाविरुद्ध कडक निर्बंध लादण्याची शक्यता आहे. यात व्हिसा मनाई, मास्कोतील प्रमुख लोकांच्या मालमत्ता गोठवणे आदींचा समावेश असेल.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.