आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अश्लिल छायाचित्राने एअर होस्टसला आणले जमिनीवर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - इंटरनेटवर अश्लिल छायाचित्र पोस्ट केल्या प्रकरणी रशियन एअर होस्टेसला निलंबीत करण्यात आले आहे. फ्लाईट अटेंडंट पदावरील तातियाना कोज्लेंको हिने अश्लिल इशारा करणारे एक छायाचित्र रशियन सोशल नेटवर्किंग साईटवर पोस्ट केले होते. काही तासातच या फोटोला भरपूर लाईक्स मिळाले. त्यानंतर ते छायाचित्र ट्विटरवर अपलोड करण्यात आले. तिथेही शेकडो लोकांनी त्याला रिट्विट केले. त्यानंतर तातियानाला जमिनीवर आणले ते तिच्याच एअरोफ्लोट एअरलाईन्स कंपनीने. त्यांनी त्यांच्या ट्विटर अकांऊटवर तातियानाला निलंबित केल्याचे ट्विट केले.

त्यात लिहिले होते की, तातियानाने अपलोड केलेल्या छायाचित्रातून प्रवाशांबद्दलचा तिचा दृष्टीकोन स्पष्ट होतो. त्यानंतर तिने प्रशासनासोबत चर्चा करण्याची तयारी दाखविली आहे. मात्र, तिचे म्हणणे आहे की, ते छायाचित्र तिने पोस्ट केलेले नाही.