आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Russian Fisherman Saved From Bear Attack By Justin Bieber Ringtone

जस्टीन बीबरच्या गाण्यामुळे वाचला जीव; रिंगटोन ऐकताच पळून गेला तो...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो - अस्वलाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले इगोर)

मॉस्को -
तुम्ही विश्वास ठेवा अथवा नको ठेवा मात्र ही गोष्ट खरी आहे की, जस्टीन बीबरच्या गाण्यामुळे एका व्यक्तीचा जीव वाचला आहे. 42 वर्षाच्या इगोर उत्तर रशियाच्या याकुतिया रिपब्लिकमध्ये मासे पकडायला गेले असता त्यांच्यावर एका जंगली अस्वलाने हल्ला केला. या हल्ल्यात इगोर यांनी आपल्या शेवटच्या घटका मोजायला सुरूवातही केली होती. त्यांना हे नक्की झाले होते की, आता ते वाचणार नाही तोच इगोर यांच्या फोनवरील जस्टीन बीबरची रिंगटोन वाजली आणि तो अस्वल तेथून पळून गेला.
आता तुम्ही म्हणाल हा काय प्रकार आहे, हे कसे काय शक्य आहे. तर याचे असे आहे की, कोणत्याही नाराज अस्वलाला एकदम आश्चर्याचा धक्का बसला तर तो हल्ला करणे सोडून देतो आणि घाबरून निघून जातो. याही हल्ल्यात असेच घडले आहे. जेव्हा अस्वल इगोर यांना जीवे मारण्याच्या तयारीत होता तेव्हा रिंगटोन वाजल्याने अस्वल एकदम घाबरले आणि आपल्या जीवास धोका आहे असे समजून तेथून पळून गेले. यामुळेच इगोर यांचा जीव वाचला.

पुढे वाचा, ब्राऊन अस्वल माणसाला जीवे मारू शकतो...