आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Russian Lawmakers Revoke Right To Send Troops Into Ukraine

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

युक्रेनच्या नेत्यांवर दबाव, बंडखोरांची चर्चेची तयारी तीन महिन्यांतील हिंसाचारात वाढ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कीव्ह - युक्रेनमधील तिढा सुटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. रशियाचे समर्थन असलेल्या बंडखोरांनी नवीन सरकारसोबत वाटाघाटी करण्याची तयारी दर्शवली आहे. त्यानंतर सरकारवर पश्चिमेकडील देशांकडून दबाव वाढला आहे.

रशियाचे राजदूतासोबत झालेल्या चर्चेनंतर बंडखोरांनी वाटाघाटी करण्याची तयारी असल्याचे जाहीर केले. ही बैठक सोमवारी झाली. युक्रेनचे सैन्य माघारी घेण्याची मागणी मागे घेण्यात येणार आहे. संघर्ष करण्यापेक्षा शांततामय मार्गाने हा प्रश्न सोडवण्याची आमची तयारी आहे. म्हणूनच दोन्ही बाजूने गोळीबार थांबवण्यात आला आहे. हा गोळीबार शुक्रवारी सकाळपर्यंत थांबवण्यात आला आहे, असे आॅलेक्सांड्र बोरोडाइ यांनी स्पष्ट केले. देशात गेल्या तीन महिन्यांतील हिंसाचारात आतापर्यंत 400 जणांचा मृत्यू झाला. राष्ट्राध्यक्ष पोरोशेंको यांनी चर्चेची तयारी असल्याचे स्पष्ट केले.

चॉकलेट किंगची माघार
चॉकलेट किंग तथा राष्ट्राध्यक्ष पोरोशेंको यांनी अगोदर रशियन समर्थकांशी वाटाघाटी करण्यात येणार नसल्याचे जाहीर केले होते, परंतु पश्चिमेकडील देशांकडून त्यांच्यावर प्रचंड दबाव वाढल्याने त्यांनी बंडखोरांशी चर्चेची तयारी दर्शवली असल्याचे सांगण्यात येते.