आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

VIDEO: रशियात असे कोसळले उल्कापिंड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रशिया - रशियाच्या यूराल भागात शुक्रवारी उल्कापात झाला. आकाशात स्फोट होत असल्यासारखे ते उल्कापिंड कोसळले. निसर्गाच्या अद्भूत खेळात शेकडो लोक जखमी झाले. स्थानिक अधिका-यांच्या माहितीनुसार सुमारे 600 नागरिक जखमी झाले.

- उराल पर्वतराईत चेलियाबिन्स्क खोर्‍यात 30 किमी प्रतिसेकंद वेगाने उल्कापिंड कोसळले.

-आकाशात 10 हजार मीटर उंचीवर भयंकर स्फोट, नंतरच्या उल्कापाताने अनेक भागांत इमारतींची तावदाने फुटली. सुमारे 600 नागरिक जखमी.

-शुक्रवारी रात्री लघुग्रह पृथ्वीजवळून जाण्याआधी उल्कापिंडाने दिला दणका

- एका झिंक फॅक्टरीचे नुकसान, विद्यापीठाला सुटी

- कझाकिस्तानातही उल्कांचा पाऊस, अनेक भागांत फोन, इंटरनेट, वीजसेवा खंडित. दळणवळण ठप्प, मदतकार्याला वेग.

रशियन लष्कराला तीन उल्का सापडल्या. त्युमेन, गुरदान, स्वर्दलॉव्स्क आणि उत्तर कझाकिस्तानच्या बष्किरियामध्येही उल्कापात.