आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Russian National Park News In Marathi, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दो-यांच्या साहाय्याने उडी घेण्यासाठी सस्पेन्शन पूल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रशियामध्ये काळ्या समुद्राच्या काठावर वसलेल्या सोची या गावातील नॅशनल पार्कमध्ये लोकांसाठी वापरात आणलेला पादचारी पूल चर्चेत आहे. सुमारे १८०० फूट लांबीचा हा सस्पेन्शन पूल असून यावरून पायी चालणा-या आणि दोराच्या साहाय्याने हवेत उड्या घेणा-या साहसी लोकांसाठी याचा वापर होणार आहे. नॅशनल पार्कच्या शेवटच्या टोकास बनलेल्या व सुमारे ६५० फूट उंचीवर असलेल्या या पुलावरून नागरिकांना निसर्गाची सुंदर दृश्ये कॅमे-यात टिपता येतात. हा पूल दोराच्या साहाय्याने हवेत उडी घेण्याचेच जबरदस्त आकर्षण लोकांत आहे. यासाठी अनेक पॉइंट बनवण्यात आले आहेत. तसे पाहता हा पूल एजे हॅकेट सोची स्कायपार्कचा भाग आहे. सोची स्कायपार्क न्यूझीलंडच्या सहकार्याने दोन वर्षांत बनवण्यात आला असून यात ७४० टनाचे लोखंड आणि २ हजार क्युबिक मीटर काँक्रीट वापरण्यात आलेले आहे. या भागात ९ रिश्टर स्केल इतके तीव्र भूकंप होतात. या पुलावर ३ हजार लोक उभे राहू शकतात.
myscienceacademy.org