आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुपर कॉम्प्यूटर कालबाह्य होणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाच वर्षांपूर्वी आयबीएमने रोडरनर सुपर कॉम्प्युटरचे डिझाइन बनवले होते. अमेरिकन अणुप्रकल्पातील गळतीची नोंद ठेवण्याचे काम या कॉम्प्युटरचे होते. तो दर सेकंदाला एक लाख अब्जांपेक्षा जास्त गणना करू शकत होता. त्यामुळेच जून 2008 आणि जून 2009 मधील अखेरच्या पाचशे सुपर कॉम्प्युटरच्या यादीत तो पहिल्या क्रमांकावर होता. पण आज तो परवडण्यासारखा नाही. त्याच्या कामापेक्षा जास्त विजेचे बिल येते. अमेरिकेतील न्यू मेक्सिको येथील डिपार्टमेंट ऑफ एनर्जीच्या लॉस अलामोस नॅशनल लॅबोरेटरीमध्ये रोडरनरवर अंतिम अध्ययन करून तो नष्ट केला जाणार आहे. रोडरनर बनवण्यात 120 दशलक्ष डॉलर एवढा खर्च आला होता.