आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Russian Streets Turned Into Frozen Block After Water Pipes Burst

PHOTOS: उणे तापमानात पाईप फुटले, रस्त्यावरील पाण्‍याचे झाले बर्फ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डुदिन्का - रशियाच्या डुदिन्का शहरात तापमान शून्याखाली गेल्याने पाण्‍याचे पाइप फुटले असून रस्त्यावरील पाणी गोठले आहे. सैबेरियात शक्त‍िशाली वादळांमुळे पाण्‍याचे अनेक पाईपलाइन फुटले आहेत. फुटलेल्या पाइपमधून पाणी रस्त्यावर आले. उणे 40 डिग्री सेल्सिअस तापमानामुळे पाणी रस्त्यावर गोठल्याने रस्ते बंद झाले आहेत. रस्त्यावर उभे असलेल्या गाड्या बर्फाने झाकून गेले आहे. अशा स्थितीत लोकांना पाणी आणि विजे विना दिवस काढावे लागत आहे.
डुदिन्काच्या रहिवाशांनी या ताज्यास्थितीची छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर केली आहेत. छायाचित्रांमध्‍ये बर्फाने आच्‍छादित गाड्या दिसत आहे. आर्किटिक्ट समुद्राच्या किना-यावर असलेल्या मध्‍य सैरेबिया प्रांतातील डुदिन्का शहरात 22 हजार लोक राहतात. येथे पाणी गरम करुन त्याचा पुरवठा नागरिकांना केला जातो.मात्र गरम पाणी पुरवठा करणारे पाईप फुटल्याने त्यात बर्फ जमले आहे. वादळामुळे पाणी आणि वीज पुरवठा खंडित झाला असून शहरात आणीबाणी जाहीर करण्‍यात आली आहे.

पुढे पाहा, पाहा डुदिन्काची सद्य:स्थिती...