रशियाच्या ग्रामीन भागातील कुर्तना मातसजार्व तलावात दुस-या महायुद्धात वापरण्यात आलेल्या टँक सापडला आहे. 50 वर्षापासून तलावात पडून असलेल्या या टँकची माहिती मात्र उपलब्ध झालेली नाही.
तलावात युद्धासाठी वापरण्यात आलेला टँक कोठून आला याविषयी विविध प्रकारचे अंदाज लावले जात आहे. मात्र ठोस कारण कोणलाही देता आले नाही. हा टँक सर्वात आगोदर 50 वर्षापूर्वी एका लहान मुलाने पाहिला होता. तेव्हा या तलावाच्या पाण्यातून बूडबूडे निघत असल्याचे मुलाला आढळले, काही तरी असेल म्हणून त्यावेळी या मुलाने दुर्लक्ष केले. या घटनेला आज 50 वर्षे उलटून गेली आहेत.
मात्र गेल्या आठवड्यात वयक्तीक कामानिमित्त ही व्यक्ती
आपल्या गावाकडे आली. तलावजवळून गेल्यानंतर या व्यक्तीला पाण्यात एक मोठी वस्तु असल्याचे लक्षात आले. बालपणी पाहिलेल्या ठिकाणी ही वस्तु दिसत असल्यामुळे, तलावात नेमके काय आहे. हे जाणून घेण्यासाठी परिसरातील लोकांना बोलावले. वस्तू पाण्याच्या बाहेर काढल्यानंतर दुस-या महायुद्धात वापरण्यात आलेला टँक असल्याचे लक्षात आले.
पुढील स्लाईडवर पाहा या टँकची फोटो...