आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सचिनच्या सन्मानार्थ काढली सुवर्णनाणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरला आणखी एक सन्मान बहाल करण्यात आला आहे. ब्रिटनमधील लक्झरी गुड ब्रँड म्हणून ओळखल्या जाणार्‍या ईस्ट इंडिया कंपनीने सचिनच्या सन्मानार्थ एक खास सोन्याचे नाणे काढले आहे. या नाण्यासोबत कंपनी सचिनची स्वाक्षरी असलेली एक बॅटही देणार आहे.

विशेष म्हणजे या नाण्यावर सचिनचे पूर्ण नाव सचिन रमेश तेंडुलकर असे लिहिण्यात आले आहे. एवढेच नव्हे, या नाण्यावर मुंबईची छबी पण कोरण्यात आली आहे. मुंबई ही सचिनची कर्मभूमी असल्याने कंपनीने मुद्दाम या महानगराची दखल घेत गेट वे आॅफ इंडियाचे चित्र या नाण्यावर कोरले आहे. या सन्मानामुळे कृतार्थ झाल्याची भावना सचिनने व्यक्त केली.

12.24 लाख रुपये किंमत
200 ग्रॅम सोने नाण्यात
210 नाणीच काढली जाणार