इंटरनॅशनल डेस्क - इराकचे हुकूमशाहा सद्दाम हुसेन यांना फाशीची शिक्षा देणारे न्यायाधीश रौफ अब्दुल रहेमान यांना आयएसआयएसच्या दहशतवाद्यांनी अपहरण करून फासावर लटकवले आहे. रहेमान यांनी 2006 रोजी सद्दाम यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. यामुळे इराकमध्ये त्यांच्यावर तीव्र टीका करण्यात आली होती.
दोन दशकांपर्यंत इराकचे राष्ट्राध्यक्ष असलेल्या सद्दाम हुसेन यांचा जन्म 1937 मध्ये बगदादच्या उत्तरेला असलेल्या तिकरितमध्ये झाला. सद्दाम यांनी 1980 मध्ये नव्या इस्लामिक क्रांतीचा प्रभाव कमी करण्यासाठी इराणच्या पश्चिमकडील सीमेलगत आपली सेना उतरवली होती. यामुळे आठ वर्षे चाललेल्या युध्दात लाखो लोकांना जीव गमवावे लागले. या दरम्यान जुलै 1982 मध्ये सद्दाम यांच्यावर आत्मघाती हल्ला झाला. यानंतर त्यांनी शिया बहुल दुजैल गावातील 148 लोकांची हत्या घडवून आणली.
13 डिसेंबर, 2003 मध्ये सद्दाम यांना अमेरिकी सैन्याने पकडले. ते तिकरीत शहराच्या एका घरात लपले होते. त्यांच्यावर अनेक खटले चालवण्यात आले. दुजैल नरसंहारच्या सुनावणीनंतर सद्दाम यांना 5 नोव्हेंबर, 2006 रोजी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. डिसेंबरमध्ये त्यांनी न्यायालयात केलेल्या पुनर्विचार याचिका फेटाळण्यात आली. सद्दाम आपल्या विलासी जीवनासाठी प्रसिध्द होते. मृत्यूनंतर अमेरिकी सैन्याने त्यांच्या महालांचा ताबा घेतला. सद्दाम यांची अनेक महाले होती. पण यापैकी एका महालात ते आपल्या जन्मदिनानिमित्त जात असे.
पुढे पाहा, सद्दामच्या महालांची छायाचित्रे, जेव्हा अमेरिकन सैन्याने त्यांच्यावर ताबा मिळवला होता....