आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेत लो वेस्ट पँटवर बंदी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लॉस एंजलिस - लो वेस्ट पँट घालून डिसेंट दिसण्याचा मोह अमेरिकेतील तरूणींना आवरावा लागणार आहे. कारण तोकड्या चड्ड्या घालण्यास अमेरिकेतील एका शहरात यापुढे बंदी घालण्यात आली आहे.

देशामध्ये अशा प्रकारच्या लो वेस्ट पँट घालण्याची परंपरा आहे. लो वेस्टमुळे फजिती आणि लाजिरवाणे प्रकार वाढले होते. टरकाटरकीच्या अनेक घटना सार्वजनिक ठिकाणी घडल्या. त्यातून आंबटशौकिनपणाला प्रोत्साहन मिळू लागले. त्यामुळे टेरीबोन शहरात त्यावर बंदी घालण्यात आली आहे. तरीही एखाद्याने या नियमाचे उल्लंघन करण्याचे धाडस केले तर त्यास दंड भरावा लागणार आहे. त्याचबरोबर 16 तास समाजसेवेची शिक्षाही भोगावी लागणार आहे. लो वेस्टमुळे नको तितके अंगप्रदर्शन होते. ही कृती गुन्हा नसला तरी मूर्खपणाची मात्र नक्कीच आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे.