आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकशाही नव्हे; शरीयत कायदाच पाकिस्तानसाठी बेस्ट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद - महागाई, दहशतवादाच्या समस्येने हैराण असलेला आपला देश चुकीच्या दिशेने चालला असल्याचे मत पाकिस्तानी तरुणांनी व्यक्त केले आहे. मे महिन्यातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ब्रिटिश कौन्सिलने घेतलेल्या तरुणांच्या सर्वेक्षणात 40 टक्के तरुणांनी पाकिस्तानसाठी इस्लामच्या शरीयत कायद्यावर आधारित राजकीय व्यवस्थाच सर्वोत्तम असल्याचे मत नोंदवले आहे.
11 मे रोजी होणार्‍या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने ‘मतदान करणारी भावी पिढी ’ हा अहवाल बुधवारी प्रकाशित करण्यात आला. 18 ते 29 वयोगटातील तरुणांवर केंद्रित असे हे सर्वेक्षण आहे.पाकिस्तानी तरुणांमध्ये नैराश्याची भावना अधिक असल्याचे यात दिसून आले आहे. यामध्ये बहुसंख्य तरुण हे प्रथमच मतदानाचा हक्क बजावणार आहेत, असे मत सर्वेक्षणात महत्त्वाची
भूमिका अदा करणार्‍या स्तंभलेखिका फसी झाका यांनी नमूद केले आहे. सन 2007 मध्ये 50 टक्के तरुणांनी पाकिस्तान दिशाहीन झाल्याचे नमूद केले होते. आता हे प्रमाण 94 टक्क्यांवर पोहोचले आहे, असे झाका म्हणाल्या. 38 टक्के तरुणांनी इस्लामचा शरीयत कायदा देशासाठी योग्य असल्याचे मत व्यक्त केले असून 32 टक्के तरुण लष्करशाहीला, तर केवळ 29 टक्के तरुण लोकशाहीला अनुकूल असल्याचे दिसून आले.

शरीयत कायदाच का?
नैतिक मूल्यांची जोपासना करणारा भ्रष्टाचार निर्मूलनासाठी योग्य वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण आदी सुविधा जनतेला पुरवण्यासाठी हीच राजकीय पद्धत योग्य.

आठवणीत केवळ दुर्घटनाच
आयुष्यातील महत्त्वाची घटना काय, असे विचारले असता कुणालाही एखादी सकारात्मक अथवा सामूहिक यश मिळवणारी घटना आठवली नाही. दुर्घटनांची जंत्रीच आठवली. त्यामध्ये सन 2005 मधील भूकंप, 2007 मधील बेनझीर भुत्तोंची हत्या, 2010 मधील महाभयंकर पूर आदी घटना आठवल्या.
2.5 कोटी मतदार
यंदाच्या निवडणुकीसाठी 18 ते 29 वयोगटातील तब्बल अडीच कोटी मतदार आहेत. मतदारांमध्ये तरुणवर्गाचे प्रमाण 30 टक्के असून हाच मतदार यंदा निर्णायक ठरणार आहे. यापैकी 40 टक्के तरुण मतदार आपला हक्क बजावणार आहेत, तर 41 टक्के तरुणांनी अद्याप निर्णय घेतलेला नाही.