आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सैबेरियातील युवराज्ञीच्या कबरीत इजिप्त बनावटीचा नेकलेस

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - पुरातत्त्वशास्त्रज्ञांना सैबेरियातील दफनभूमीत इजिप्त बनावटीचे काचेचे नेकलेस सापडले आहे. साधारण 2400 वर्षांपूर्वीचा हा दागिना असावा, असा अंदाज बांधण्यात येत आहे.
रशियन पुरातत्त्वशास्त्रज्ञांना एका कबरीत हा दागिना सापडला असून त्यांनी त्याचे नाव क्लियोपेट्रा नेकलेस असे ठेवले आहे. 25 वर्षांच्या महिलेच्या सांगाड्यावर नेकलेस आढळून आले. मृत स्त्री महिला पुरोहित असावी, अशी शक्यता आहे. पुरातत्त्वशास्त्रज्ञ येलेना बोर्दोवस्की यांना अल्ताई पर्वतात सापडलेल्या नेकलेसनंतर अशा बनावटीचे नेकलेस पहिल्यांदाच आढळले आहे. नेकलेसची बनावट नेमकी कोणत्या ठिकाणची आहे, हे समजण्यासाठी सैबेरियाने त्याचे छायाचित्र प्रसिद्ध केले आहे.

अल्ताईच्या प्राचीन वस्तूंचा मी 30 वर्षांपासून अभ्यास करत आहे. माझ्या संशोधन कार्यामध्ये एवढा सुंदर दागिना मी याआधी पाहिला नव्हता, असे नोवोसिबिर्स्क येथील इन्स्टिट्यूट ऑ फ अरकॉलॉजी अ‍ॅँड एन्थॉग्राफीचे प्रो. अ‍ॅन्ड्री बोर्दाेवस्की यांनी सांगितले. नेकलेसमधील मणी जोडण्यासाठी काचकामाच्या बारीक कलाकुसरीचा वापर करण्यात आला आहे. इजिप्तची राणी क्लीओपात्राचा हा दागिना असावा, अशी शक्यता प्रो. वार्डोवस्की यांनी व्यक्त केली आहे. मात्र या दागिन्याचा निश्चित कालावधी ठरवण्यासाठी वार्डोवस्की यांनी तज्ज्ञांचे मत मागितले आहे. नेकलेस घातलेली महिला मृत्यूवेळी 25 वर्षांची होती, असा अंदाज आहे. दफन केलेल्या ठिकाणी आढळलेल्या कांस्य धातूच्या आरशामुळे मृत महिला उच्च वर्गातील असावी. ती महिला पुरोहित असू शकते, असे बोर्डोवस्की यांनी सांगितले. तिने धार्मिक विधीत सहभाग घेतला असेल तर ती बहुदा कुमारिका असावी. तिचे समाजातील स्थान वेगळे असावे, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

दागिना कझाकिस्तानमार्गे सैबेरियात
रशियामध्ये अशा प्रकारचे नेकलेस याआधी आढळून आले नाही. इजिप्तचा दागिना दोन हजार वर्षांपूर्वी सैबेरियात कसा आला याबद्दल आपल्याला आश्चर्य वाटत नाही. इजिप्तच्या ज्या लोकांकडे नेकलेसची मालकी होती, ते कझाकिस्तानमार्गे सैबेरियात आले असावेत, अशी शक्यता बोर्डोवस्की यांनी वर्तवली आहे.