Home »International »Other Country» Saif Al-Islam Al-Gaddafi To Face Trial Within Month

गद्दाफी पुत्र सैफवर फेब्रुवारीत खटला

वृत्तसंस्था | Jan 06, 2013, 00:41 AM IST

  • गद्दाफी पुत्र सैफवर फेब्रुवारीत खटला

कैरो- लिबियाचे हुकूमशहा मुअम्मर गद्दाफी यांचा पुत्र सैफ अल इस्लाम गद्दाफी याच्यावरील खटल्याची फेब्रुवारीत सुनावणी होणार आहे.


सैल अल इस्लाम आणि माजी पंतप्रधान बगदादी अल महमुदी आणि गद्दाफी यांचे प्रमुख गुप्तहेर अब्दुल्लाह अल सेनुस्सी यांच्यावरही फेब्रुवारीत सुनावणी होणार आहे. या सर्व राजकीय आरोपींची चौकशी पुढील महिन्यापर्यंत पूर्ण होणार आहे, असे न्यायमंत्री सालाह माराघनी यांनी राष्ट्रीय दूरचित्रवाणीवरून जाहीर केले. खटल्याची सुनावणी सप्टेंबर 2012 मध्ये होणार होती; परंतु ती लांबणीवर पडली आहे. याच काळात अब्दुल्लाह अल सेनुस्सीचे लिबियाला प्रत्यार्पण करण्याची प्रक्रिया सुरू होती. सेनुस्सीच्या चौकशीतून सैफविरोधातील पुरावा मिळू शकतो, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.


लिबियावर 42 वर्षे गद्दाफी यांनी सत्ता गाजवली होती. गद्दाफी सत्तेचा पाडाव नोव्हेंबर 2011 मध्ये करण्यात आला होता. देशातील बंडखोरी आणि नाटो सैन्य यांच्यामुळे गद्दाफी यांची हुकूमशाही संपुष्टात आणण्यात यश येऊ शकले. नोव्हेंबर 2011 मध्ये सैफला अटक करण्यात आली होती. सैफ हा गद्दाफी यांचा दुस-या क्रमांकाचा मुलगा आहे.

आंतरराष्ट्रीय कोर्टालाही हवा
सैफ अल इस्लाम गद्दाफी हा आंतरराष्ट्रीय न्यायालयालादेखील हवा आहे. हेग (नेदरलँड) येथील न्यायालयाने ही मागणी केली होती. कारण सैफ व त्याच्या वकिलास लिबियात मृत्युदंड होऊ शकतो, अशी भीती हेग न्यायालयाला वाटते.

Next Article

Recommended