आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Saif Ali Khan Pataudi's Uncle May Be Next Isi Chief

सैफचे चुलत काका 'आयएसआय' प्रमुखपदाच्‍या शर्यतीत

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्‍लामाबादः पाकिस्‍तानची गुप्‍तचर संघटना 'आयएसआय'च्‍या प्रमुखपदी भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार, दिवंगत मंसूर अली खान पतोडी यांचे चुलत बंधू इस्फंदियार अली खान पतौडी यांची नियुक्ती होण्‍याची शक्‍यता वर्तविण्‍यात येत आहे. अभिनेता सैफ अली खान याचे ते काका आहेत.
आयएसआयचे विद्यमान प्रमुख लेफ्टनंट अहमद शुजा पाशा यांची लवकरच गच्‍छंती होणार आहे. 'मेमोगेट' प्रकरणामुळे त्‍यांच्‍यावर कारवाई होण्‍याची चिन्‍हे आहेत. अर्थात त्‍यांचा कार्यकाळ पुढील महिन्यात संपणार आहे. परंतु, पाक सरकार पाशा यांचा कार्यकाळ वाढविणार नसल्याचे वृत्त आहे. पाशा यांच्‍याकडे अतिशय महत्त्वाच्‍या विभागाचा कार्यभार सो‍पविण्‍यात येणार असल्‍याचे बोलले जात आहे. पाकच्या अण्वस्त्रांचा ताबा असलेली 'स्ट्रेटेजिक प्लॅन्स डिव्हिजन' पाशा यांच्‍याकडे सोपविण्याची तयारी सुरु आहे.
आयएसआयच्या प्रमुखपदासाठी सध्या लष्करी गुप्तचर संघटनेचे महासंचालक मेजर जनरल नोशाद कयानी, लाहोरचे कॉर्प्स कमांडर लेफ्टनंट जनरल रशीद आणि कराची कॉर्प्स कमांडर लेफ्टनंट जनरल जहिरुल इस्लाम यांच्याही नावाचा समावेश आहे. पतौडी किंवा कयानी यांच्‍याकडे पदभार सोपविण्‍यास विरोध होण्‍याचीही शक्‍यता आहे. परंतु, पतौडी हे सध्‍या आयएसआयचे महासंचालक आहेत. हे पद आयएसआयमध्‍ये दुस-या क्रमांकाचे आहे. त्‍यामुळे साहजिकच त्‍यांनाच क्रमांक एकचे पद देण्‍यात येईल, अशी चर्चा जोरात आहे.
कयानी, पाशा यांची गच्छंती?
आयएसआय प्रमुख लेफ्टनंट पाशा यांची झाडाझडती